Shani Nakshtra Parivartan 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये, शनिदेवाला महत्त्वाचा ग्रह मानण्यात आला आहे. शनीला कर्माचा दाता देखील म्हणतात. अशी मान्यता आहे की, शनिदेव सर्व कर्मांचा हिशेब ठेवतात आणि त्यानुसार ते फळ देतात. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाने १५ ऑक्टोबरला ‘धनिष्ठा नक्षत्रा’त प्रवेश केलाय. २४ ऑक्टोबरपर्यंत याच स्थितीत राहणार आहेत आणि नंतर ते शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. ‘धनिष्ठा नक्षत्रात’ शनिदेवाचा प्रवेश झाल्याने काही राशींना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. त्यांना मोठे फायदे मिळू शकतात. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींना होऊ शकतो धनलाभ
मिथुन राशी
शनिदेवानं ‘धनिष्ठा नक्षत्रा’त प्रवेश केल्याने मिथुन राशींच्या लोकांना मोठा लाभ होऊ शकतो. शनिदेवाची या राशीतील लोकांवर विशेष कृपा राहू शकते. या काळात बेरोजगारांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. मोठा धनलाभ होऊन समाजात मान-सन्मान वाढू शकतो. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात तुमचा आनंद कायम राहू शकतो.
(हे ही वाचा : २०२४ पासून ‘या’ राशीतील लोकांचे सुखाचे दिवस सुरु? देवगुरुच्या कृपेने धनलाभ होऊन राजकारणी लोकांना मिळू शकतो पद )
कन्या राशी
कन्या राशीतील लोकांना शनिदेवाच्या कृपेने मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील मंडळीना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकार्यांचे सहकार्य मिळाल्याने त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहू शकते. व्यवसायासाठीही हा काळ चांगला राहू शकतो. या काळात अध्यात्माकडेही तुमचा कल वाढू शकतो.
तूळ राशी
शनिदेवाचे ‘धनिष्ठा नक्षत्रा’त प्रवेश तूळ राशीतील लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या काळात प्रत्येक पावलावर नशीब तुमचं साथ देऊ शकतो. या काळात तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन या राशीतील लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या वाणीने अनेक कामांमध्ये यश मिळू शकते. यासोबतच या काळात आरोग्यही चांगले राहण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)