Shani Transit In January 2023: २०२३ हे वर्ष अनेक ग्रहांच्या राशी परिवर्तनाचे व नक्षत्र भ्रमणाचे वर्ष ठरणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी महिन्यातच सर्वात शक्तिशाली शनिदेव आपल्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभ राशीत पदार्पण करणार आहेत. याचा प्रभाव सर्वच राशींवर दिसून येणार आहे. १४ ते १७ जानेवारी यादरम्यान शनीचे संक्रमण सुरु होऊन १७ जानेवारीला शनिदेव कुंभ राशीत येणार आहेत. तर दुसरीकडे १४ जानेवारीला मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्यदेव सुद्धा राशीभ्रमण करणार आहेत.
जेव्हा कोणताही ग्रह इतर राशीत परिवर्तन करतो तिथूनच त्याचा शुभ- अशुभ परिणाम दिसू लागतो. २०२३ मध्ये अशा तीन राशी आहेत ज्यांच्या भाग्यात प्रचंड धनलाभाचे योग तयार होत आहेत. या तीन राशींमध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का? आणि असल्यास तुम्हाला नेमका काय व कसा लाभ होऊ शकतो हे आज आपण जाणून घेऊयात.
मेष राशिभविष्य (Aries Horoscope 2023)
ज्योतिषीय अभ्यासकांच्या माहितीनुसार मेष राशीचं व्यक्तींना २०२३ हे वर्ष सर्वात लाभदायक ठरू शकते. वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी येईल पण त्यासह तुम्हाला धनलाभाचे सुद्धा योग आहेत. मार्चच्या सुमारास आपलयाला व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत. आपल्याला कार्यस्थळी मान सन्मान लाभण्याची शक्यता आहे. जर तुमचे काम एखाद्या परदेशी कंपनीशी संबंधित असेल तर तुम्हाला येत्या काळात बोनस रूपात प्रचंड धनलाभ होऊ शकतो.
हे ही वाचा<<मेष राशीसाठी २०२३ वर्ष कसे असणार? जूनपर्यंत प्रचंड धनलाभाची संधी, प्रेमाची स्थिती कशी असणार?
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope 2023)
२०२३ च्या १७ जानेवारीला शनिदेव कुंभ राशीत जरी प्रवेश घेत असले तरी त्याचा सर्वात शुभ प्रभाव वृषभ राशीत दिसून येऊ शकतो. वृषभ राशीचे स्वामी मंगळ आहेत. १६ जानेवारीला मंगळदेव सुद्धा भ्रमण करणार आहेत. शनि व मंगळाच्या युतीने आपल्याला नव्या कामाची सुरुवात करण्याची संधी मिळेल. २०२३ च्या मध्य काळात तुम्हाला जोडीदाराची साथ लाभून मग धनलाभ होऊ शकतो. आरोग्याबाबत काळजी घेण्याची व आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची खूप गरज आहे.
हे ही वाचा<< २९ डिसेंबरपासून ‘या’ ५ राशींना शनिदेव देणार प्रचंड धनलाभ? पण ‘या’ माणसांपासून राहा सावध
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope 2023)
मिथुन राशीचे भाग्य २०२३ मध्ये उन-सावलीप्रमाणे बदलणार आहे. जानेवारीत तुम्हाला प्रचंड धनलाभ होऊ शकतो पण हे पैसे तुम्हाला गुंतवण्याकडे लक्ष द्यायला हवे. येत्या काळात शनिदेव आपल्या राशीच्या अशुभ स्थानी आहेत, हा प्रभाव टाळायचा असल्यास आपल्याला अधिक सतर्क राहून निर्णय घ्यायला हवेत. तुम्हाला जुन्या मित्राच्या रूपात कामासाठी एक भागीदार लाभू शकतो, अगदी सहज सुरु केलेल्या कामातून प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणत्याच कल्पनेला तुच्छ समजून मनातून काढून टाकू नका.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)