Mesh Rashi Aries Rashifal 2023 In Marathi: मेष राशिचा स्वामी मंगळदेव आहे. मंगळ हा साहस व पराक्रमाचा कारक मानला जातो. २०२३ मध्ये मंगळाच्या राशीत लग्नस्थानी राहू व चंद्र विराजमान होणार आहेत. दुसरीकडे १७ जानेवारीला शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत यामुळे मेष राशीच्या प्रभावकक्षेत शनि ११ व्या स्थानी स्थिर होणार आहे. यामुळे शनि व मंगळाच्या युतीने पंचमहापुरुष राजयोग सुद्धा तयार होत आहे. २२ एप्रिलला मेष राशीत गुरु ग्रह गोचर करून लग्नस्थानी स्थिर होणार आहे यामुळेही एक अत्यंत शुभ राजयोग तयार होत आहे. या ग्र्हांच्या स्थितीनुसार २०२३ हे वर्ष मेष राशीसाठी कसे असणार आहे हे आपण पाहुयात..
मेष राशीच्या मंडळींसाठी आर्थिक स्थिती कशी असणार? (Finance Of Aries Zodiac In 2023)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी २०२३ हे वर्ष आर्थिक दृष्टीने अत्यंत शुभ ठरू शकते. आपण येत्या काळात वाहन व प्रॉपर्टी खरेदी करू शकता. शनि व गुरूच्या युतीने येत्या काळात आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. शनिदेव आपल्या कुंडलीत लाभदायक स्थितीत आहेत तर गुरु ग्रह कुंडलीत लग्नस्थानी आहे. यामुळेच गुरु ग्रह आपले भाग्य उजळण्यास कारण ठरू शकतो. या दोघांच्या युतीने आपण प्रचंड धनलाभ मिळवू शकता.
मेष राशीच्या करिअरची दिशा बदलणार? (Busniess Of Aries Zodiac In 2023)
ज्योतिष शास्त्राच्या माहितीनुसार २०२३ हे वर्ष २०२२ च्या तुलनेत मेष राशीसाठी अधिक प्रगतीचे योग घेऊन येत आहे. शनिदेवाने १७ जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश घेताच व्यवसायात आपल्याला धनलाभ होऊ शकतो. शिवाय जी कामे अडकून पडली होती ती सुद्धा मार्गी लागू शकतील. आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. जर आपण नोकरी बदलण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्हाला येत्या काळात संवाद कौशल्यावर थोडे काम करावे लागेल, यानंतर आपल्या मनपसंत नोकरीची संधी मिळू शकते. एप्रिलच्या नंतर आपल्याला नोकरी व्यवसायात प्रगती अनुभवता येऊ शकते.
मेष राशीच्या विद्यार्थ्यांना कसे जाणार वर्ष? (Student Of Aries Zodiac In 2023)
मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२३ हे वर्ष शुभ ठरू शकते. वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला परदेशी शिक्षणाची संधी मिळू शकते. २२ एप्रिल नंतर जेव्हा गुरु ग्रह आपल्या राशीच्या लग्न स्थानी येतील तेव्हा तुम्हाला सरकारी नोकरीची ऑफर येण्याची संधी आहे. येत्या काळात तुम्ही मनावर नियंत्रण ठेवायला हवे. राहूच्या प्रभावाने तुमचे होते काम बिघडू शकते पण तुमची प्रयत्न सोडता कामा नये.
मेष राशीच्या लोकांचे आरोग्य कसे राहणार? (Health Of Aries Zodiac In 2023)
मेष राशीच्या मंडळींचे आरोग्य तसे स्थिर असू शकते पण २०२२ च्या तुलनेत येत्या वर्षात छोट्या मोठ्या आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. बाहेरचे जेवण तुमचा शत्रू ठरू शकते. यावेळी तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. सुरुवातीचे चार महिने तुमचे त्रास वाढू शकतात. पोटाचे त्रास वाढू नये यासाठी सतर्क राहा.
हे ही वाचा<< ३ दिवसांनी ‘या’ ५ राशी होणार प्रचंड श्रीमंत? पौष अमावस्येला ‘या’ रूपात माता लक्ष्मी करू शकते पैशांचा वर्षाव
मेष राशीचे वैवाहिक जीवन (Married life And Relationship Of Aries Zodiac In 2023)
मेष राशीच्या मंडळींना वर्षाच्या सुरुवातीला थोडं सावध राहावं. लग्नस्थानी राहू व केतू असल्याने व १२ व्या प्रभावस्थानी गुरु ग्रह असल्याने वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते. तुमच्या जोडीदाराच्या छोट्या मोठ्या गोष्टी कधीतरी मान्य कराव्यात तर जिथे तुम्हाला शक्य होणार नाही तिथे स्पष्ट बोलावे पण चुकूनही मनात गोष्टी साचवून ठेवू नका. यामुळे वाद वाढू शकतात. २०२२ संपण्याआधीच तुमचे मतभेद दूर करा. २०२२ च्या डिसेंबर मध्ये मेष राशीच्या अविवाहित व्यक्तींना लग्नाचे योग आहेत.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)