Mesh, Vrishabh and Mithun Rashifal 2023: नववर्ष सुरु होण्यासाठी आता अवघे १७ दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्षात अनेक महत्त्वाचे ग्रह गोचर करणार असल्याने येत्या काळात राशीचक्रातील सर्वच राशींवर चांगला वाईट प्रभाव जाणवणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार २०२३ मध्ये शनि,राहू, गुरु असे सगळे महत्त्वाचे ग्रह गोचर करणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात मंगळ सुद्धा गोचर करणार आहे. येत्या नववर्षात तुम्हाला नशिबाची, ग्रहांची साथ लाभणार का याविषयी तुम्हालाही कुतुहूल असेल ना? आज आपण तीन राशींसाठी येणारे नववर्ष २०२३ कसे असणार आहे हे जाणून घेणार आहोत. शनि व मंगळाच्या साथीने २०२३ मध्ये मेष, वृषभ, मिथुन राशींना नेमके कसे लाभ होणार व कोणत्या बाबतीत खबरदार राहावे लागणार आहे हे आज आपण पाहुयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०२३ वर्ष मेष राशीसाठी कसे जाईल?

मेष (Mesh Rashifal 2023): २०२३ मध्ये मेष राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. येत्या काळात आपल्याला नवीन कामाच्या निमित्ताने प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. शनिदेव आपल्या राशीत गोचर करून राशीच्या प्रभावकक्षेत ११ व्या स्थानी स्थिर होणार आहेत. तसेच गुरुदेव सुद्धा तुमच्या राशीत गोचर करून कुंडलीतील लग्न स्थानी भ्रमण करणार आहेत. येत्या नववर्षात सुरुवातीचे महिने तुम्हाला प्रचंड धनलाभ होऊ शकतो. आपले आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. ज्यांचा कारभार ऑइल, लोखंड, पेट्रोल यासंबंधित आहे त्यांना व्यवसायात प्रचंड लाभ होऊ शकतो/ मात्र मेष राशीच्या मंडळींना प्रेमात धोका मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सुद्धा बिघडू शकते. बेजबाबदारपणा टाळावा.

२०२३ वर्ष वृषभ राशीसाठी कसे जाईल?

वृषभ (Vrishabh Rashifal 2023): वृषभ राशीसाठी २०२३ हे वर्ष आर्थिक दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. शनिदेव आपल्या कुंडलीत गोचर करून दहाव्या स्थानी स्थिर होणार आहेत. तर गुरु बृहस्पती आपल्या राशीत १२ व्या स्थानी भ्रमण करणार आहेत. येत्या काळात आपल्याला नव्या नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. आपण ज्या ठिकाणी अगोदरच काम करत आहात तिथे पगारवाढ मिळू शकते. येत्या वर्षात तुमच्या भाग्यात नवीन प्रॉपर्टी विकत घेण्याचे योग आहेत. विद्यार्थी दशेतील मंडळींसाठी येणारा काळ यशप्राप्तीचा ठरू शकतो. रिलेशनच्या बाबत मात्र आपल्याला थोडं जपून राहण्याची गरज आहे. तुमच्याकडून नकळत जोडीदाराचे मन दुखावले जाऊ शकते. नीट विचार करून मगच बोला. जोडीदाराला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्या.

हे ही वाचा<< मकर, कुंभ व मीन राशीसाठी 2023 हे वर्ष कसे असणार? शनिच्या प्रिय राशींना ‘या’ रूपात होऊ शकतो प्रचंड धनलाभ

२०२३ वर्ष मिथुन राशीसाठी कसे जाईल?

मिथुन (Mithun Rashifal 2023): नववर्षात मिथुन राशीच्या मंडळींना वैवाहिक सुख प्राप्तीचे योग आहेत. जोडीदारासह व कुटुंबासह नाते सुधारण्यास मदत करणारा हा काळ आहे. येत्या वर्षात लग्न जुळण्याची पूर्ण शक्यता आहे. या वर्षात तुम्हाला प्रचंड मेहनत व त्याहून अधिक धनलाभ असे दुहेरी योग आहेत. तुमच्या राशीच्या प्रभावकक्षेत शनिदेव गोचर करून आठव्या स्थानी स्थिर होणार आहे. यंदाच्या वर्षात तुम्हाला नवीन संशोधनात मदत होऊ शकते. मिथुनराशीच्या मंडळींना तर १७ जानेवारी पासून शनीच्या ढैय्यातुन मुक्ती मिळणार आहे. यामुळेच तुमच्या धनप्राप्तीत वाढ होणार आहे असे दिसतेय.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)