Lucky Zodiac Sign For New Year 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार २०२३ हे वर्ष अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातच ग्रह नक्षत्रांच्या प्रचंड मोठ्या उलाढाली होऊन अनेक राशींच्या नशिबाला कलाटणी मिळण्याचे योग आहेत. गुरु, शनि, मंगळ असे महत्त्वपूर्ण ग्रह येत्या वर्षात राशी व नक्षत्र परिवर्तन करणार असल्याने काही राशींसाठी प्रचंड धनलाभाचे योग तयार होत आहेत. २०२३ मध्ये शनीच्या प्रिय राशींना तर श्रीमंतीचे पुरेपूर योग आहेत. केवळ तुम्हाला सतर्क राहून सजगतेने निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर तुम्ही योग्य दिशेने व योग्य वेळी मेहनत घेतली तर येत्या वर्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभून आपणही प्रचंड श्रीमंत होऊ शकता. तुर्तास अशा कोणत्या राशी आहेत ज्यांच्या भाग्यात श्रीमंती व धनलाभाची संधी आहे हे जाणून घेऊयात..

Yearly Horoscope 2023 : जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्याचं वार्षिक राशीभविष्य; जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसं असणार आगामी वर्ष

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Samsaptak Yog 2025
मिथुन राशीमध्ये निर्माण होतोय समसप्तक, ‘या’ ३ राशींच्या लोक जगतील सुख-समृद्धीचे जीवन, आयुष्यात होईल आनंदी आनंद
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार! गुरु ग्रह होणार मार्गी, मिळेल पद-प्रतिष्ठा
The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव

धनु (Dhanu Zodiac)

२०२३ या वर्षात धनु राशीवर माता लक्ष्मीची कृपा असू शकते. १७ जानेवारीला आपल्या राशीला शनिच्या साडेसातीमधून सुद्धा मुक्ती मिळू शकते. यामुळे येणारे हे वर्ष आपल्याला धन, आरोग्य व समृद्धीच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकते. आपल्याला कार्यस्थळी मान लाभण्याची शक्यता आहे. तुमच्या नशिबात साहस व पराक्रमाचे योग बनत आहेत, मात्र सतर्क राहण्याला दुसरा पर्याय नाही. आपल्याला वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. तसेच शनिदेव आपल्या राशीतून वेगळे झाल्याने प्रलंबित कामे सुद्धा मार्गी लागू शकतात.

हे ही वाचा<< नवीन वर्ष सुरू होताच ‘या’ राशींचे भाग्य चमकणार? शनिदेव देणार प्रचंड पैसा कमावण्याची संधी

मकर (Makar Zodiac)

मकर राशीवर सुद्धा माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम असू शकतो. पूर्ण वर्षभरात शनि व गुरुची कृपा आपल्या राशीवर असू शकते. शनिदेव आपल्या राशीत गोचर करून कुंडलीच्या दुसऱ्या स्थानी स्थिर होणार आहेत. तर गुरु ग्रह आपल्या राशीच्या चतुर्थ स्थानी भ्रमण करणार आहे. यामुळे आपल्याला धनसमृद्धी व प्रगतीची संधी आहे. आपल्या भाग्यात अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. आपल्या वाणी व कौशल्याच्या बळावर आपण उच्च पद प्राप्त करू शकता. तुम्हाला आई वडिलांच्या मदतीने आयुष्यात मोठा बदल घडवून आणता येऊ शकतो असे चिन्ह आहे.

हे ही वाचा<< तूळ राशीसाठी २०२३ वर्ष कसे असेल? बुधादित्य राजयोग बनल्याने मिळू शकतो प्रचंड धनलाभ; आरोग्य कसे असणार?

कुंभ (Kumbh Zodiac)

कुंभ राशीच्या भाग्यात २०२३ मध्ये सर्वात मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. आपल्या राशीत शनिचे गोचर होत असल्याने आपल्या राशीवर अडीच वर्ष प्रभाव कायम असणार आहे. मात्र कुंभ ही शनिच्या आवडत्या राशींपैकी एक आहे यामुळेच आपल्याला शनिचा प्रभाव हा फायदेशीर ठरू शकतो. आपल्या आर्थिक मिळकतीचे स्रोत व मार्ग बदलू शकतात. लक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने आपल्याला सुख, वैभव व धनप्राप्ती होऊ शकते. तसेच अविवाहित मंडळींच्या नशिबात लग्न जुळण्याचे सुद्धा योग आहेत.

हे ही वाचा<< ३० वर्षांनी शनिचा कुंभ राशीत प्रवेश, गुरुदेवही प्रसन्न! २०२३ मध्ये तुम्हीही होणार श्रीमंत? प्रेम व आरोग्य कसे असेल?

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader