Yearly Horoscope 2023: नवीन वर्ष म्हणजेच २०२३ हे अनेकांसाठी शुभ वार्ता व प्रगतीच्या संधी घेऊन येणार आहे. नवीन वर्ष सुरु होण्यासाठी आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. डिसेंबरच्या उर्वरित पंधरवड्यातील ग्रहांची स्थिती पाहता येत्या नववर्षाच्या आधीच काही राशींना प्रचंड लाभ होऊ शकतो. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात अनेक मोठे व महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. १६ जानेवारीला मंगळ, १७ जानेवारीला शनिचे संक्रमण होणार आहे. यामुळे काही राशींना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. शनीच्या साडेसातीतुन मुक्तीसाठी हा येणारा काळ प्रभावी ठरणार आहे. दरम्यान नववर्षात तूळ, वृश्चिक, धनु राशीला करिअर, प्रेम व आर्थिक बाबीत लाभ होणार की तोटा हे आता आपण सविस्तर पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२३ वर्ष तूळ राशीसाठी कसे जाईल? (Libra Rashibhavishya 2023)

तूळ राशीसाठी येणारे वर्ष सर्वात लाभदायक ठरू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे १७ जानेवारीला शनिने कुंभ राशीत प्रवेश घेताच तूळ राशीला साडेसातीचं प्रभावातून मुक्ती मिळणार आहे. तसेच बुध ग्रहाच्या कृपेने याच काळात लक्ष्मी नारायण राजयोग सुद्धा जुळून येणार आहे. याचा फायदा तूळ राशीला होऊ शकतो. तूळ राशीची मंडळी ही आयुष्यात संतुलन प्राप्त करतील जेणेकरून त्यांना मानसिक सुख व शांती लाभू शकते. २०२३ या वर्षात गुरु बृहस्पती आपल्या मार्गातून समस्यां दूर करण्याचे काम करू शकतो. तुमच्या जोडीदाराकडून एखादे गोड सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला येत्या काळात परदेशी नोकरीची संधी येऊ शकते पण काही कारणास्तव सर्व काही जुळूनही तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागू शकते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचा लाभ होऊ शकतो.

२०२३ वर्ष वृश्चिक राशीसाठी कसे जाईल? (Scorpio Rashibhavishya 2023)

वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ. या राशीच्या लोकांना मनातून आनंद होत असला तरी चेहऱ्यावर मात्र तसे दिसत नाही. तुम्हाला येत्या काळात साहस करण्याची संधी मिळू शकते. जानेवारी ते मे हा काळ तुम्हाला संमिश्र सुख आणू शकतो. म्हणजेच तुम्हाला सुख प्राप्तीसाठी अधिक मेहनत करावी लागेल. शनि गुरुची तुमच्यावर कृपादृष्टी असू शकते. सप्टेंबर पर्यंत तुमची गुपितं लोकांसमोर न सांगणे फायद्याचे ठरू शकते. या येत्या वर्षात आर्थिक स्थितीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला हा काळ सक्षम बनवू शकतो. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना येत्या काळात लक्ष्मी नारायण योग बनल्याने अपार फायदा होऊ शकतो.

हे ही वाचा<< कर्क, सिंह व कन्या राशीसाठी 2023 हे वर्ष कसे असणार? शनिदेव ‘या’ व्यक्तीच्या रूपात देऊ शकतात प्रचंड धनलाभ

२०२३ वर्ष धनु राशीसाठी कसे जाईल? (Sagittarius Rashibhavishya 2023)

धनु राशीचं मंडळींचा स्वभाव चिकित्सक असतो. त्यामुळे ही मंडळी हुशार व्यक्तीकडे त्वरित आकर्षित होतात. या राशीचं मंडळींना येत्या काळात आपला जन्माचा जोडीदार लाभण्याची शक्यता आहे. तुम्ही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकता. या वर्षात शनिदेव तुम्हाला कष्ट देऊ शकतात पण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुम्हाला संकटातून तारून नेऊ शकेल. आपल्याला धनप्राप्तीचे अनेकानेक स्रोत लाभू शकतात तसेच जुन्या गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होऊ शकतो. जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकू इच्छित असाल तर तुम्हाला उत्तम ग्राहक मिळू शकतो.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani transit in january new year 2023 libra scorpio sagittarius can get more money dhanlabh check your yearly horoscope svs