Shani Uday In Kumbh: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिची चाल ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शनिदेव हे अत्यंत कमी वेगाने मार्गक्रमण करतात यामुळेच एका राशीत स्थिर झाल्यावर त्याचा प्रभाव किमान अडीच तर कमाल साडे सात वर्ष त्या राशीवर टिकून असतो. इतकंच नव्हे तर अन्य १२ राशींवर सुद्धा याचा परिणाम होतो. शनिचा प्रभाव हा भयंकर मानला जातो. मात्र अशा काही राशी आहेत ज्यांना शनिदेव त्रास देत नाहीत. उलट शनिच्या चालीनुसार या राशींच्या भाग्यात धनलाभ व प्रगतीच्या संधी निर्माण होत असतात. येत्या नववर्षात शनिच्या बदलाने काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. कोणत्या राशीला धनलाभाची संधी आहे हे जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार १७ जानेवारी २०२३ ला शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत तर ९ मार्च ला शनिदेव कुंभ राशीत उदय होणार आहे. यामुळे शश महापुरुष राजयोग तयार होत आहे. याचा प्रभाव ४ राशींवर अत्यंत शुभ ठरणार आहे. या राशीच्या मंडळींना येत्या ३ महिन्यात प्रचंड प्रगती व धनलाभ मिळवण्याची संधी आहे.
सिंह (Leo Zodiac)
शश महापुरुष राजयोग बनल्याने सिंह राशीला जोडीदाराकडून सुखप्राप्ती होण्याची चिन्हे आहेत. आपल्या राशीत सातव्या स्थानी शनिदेव हा राजयोग साकारणार आहेत. यामुळेच येत्या काळात आपल्याला कामाच्या ठिकाणी प्रचंड प्रगती लाभू शकते. तसेच तुमच्या सहकर्मचाऱ्यांची मदत मिळू शकेल. ऑफिसमधील प्रगती तुमच्या धनलाभाचे स्रोत ठरू शकेल. आपल्याला जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो तसेच वाडवडिलांच्या जमिनीचा तुम्हाला पूर्ण लाभ होण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
शश महापुरुष राजयोग धनु राशीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतो. आपल्या राशीच्या प्रभाव कक्षेत हा राजयोग तिसऱ्या स्थानावर तयार होत आहे. हे स्थान साहस व पराक्रमाचे म्हणून ओळखले जाते. या काळात भावंडांच्या रूपात तुम्हाला यश प्राप्ती व धनलाभ होऊ शकतो. आपल्याला कामाच्या ठिकाणी प्रचंड प्रगती लाभू शकते. तसेहच जी मंडळी नव्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना सुद्धा शुभ वार्ता मिळू शकतात.
मिथुन (Gemini Zodiac)
शश महापुरुष राजयोग मिथुन राशीच्या नवव्या स्थानी तयार होत आहे. हे भाग्योदयाचे स्थान म्हणून ओळखले जाते. यामुळेच येत्या तीन महिन्यात आपल्याला नशिबाची साथ लाभू शकते. तुमची प्रलंबित कामे येत्या काळात चुटकीसरशी पूर्ण होऊ शकतात. या काळात आर्थिक लाभ तुमच्या नशिबाचे दार ठोठावू शकतात. तुम्हाला व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाच्या संधी लाभू शकतात.
हे ही वाचा<< मार्च २०२३ पर्यंत ‘या’ ६ राशी होणार श्रीमंत? ३० वर्षांनी शनि व सूर्य एकत्र आल्याने प्रचंड धनलाभाची संधी
मेष (Aries Zodiac)
शश महापुरुष राजयोग बनल्याने मेष राशीसाठी प्रगतीचे योग तयार होत आहेत. शनिदेवाचा उदय आपल्या राशीच्या प्रभावकक्षेत ११ व्या स्थानी तयार होत आहेत. हे स्थान इनकम व लाभाचे स्थान मानले जाते. येत्या काळात आपल्या आर्थिक मिळकतीत वाढ होऊ शकते, तसेच तुम्हाला नोकरीच्या निमित्ताने ट्रान्स्फर केले जाऊ शकते. यामुळे तुमच्या आयुष्यात बरेच मोठे बदल होऊ शकतात पण हे बदल तुमच्या फायद्याचे ठरू शकतील
(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)