Karka, Leo and Kanya Rashifal 2023: वैदिक ज्योतिशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपले स्थान सोडून इतर राशीत किंवा नक्षत्रात प्रवेश घेतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्वच १२ राशींवर दिसून येतो. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार येत्या नववर्षात म्हणजेच २०२३ मध्ये अगदी जानेवारी महिन्यापासूनच अनेक ग्रह आपले स्थान बदलून गोचर करणार आहेत. मुख्य म्हणजे या ग्रहांमध्ये कर्मदाता शनि, भाग्यदायी मंगळ व बुध,गुरु, शुक्र असे मोठे व महत्त्वाचे ग्रहसुद्धा समाविष्ट असणार आहेत. येत्या १७ जानेवारी शनि कुंभ राशीत प्रवेश घेणार आहे, तर त्याआधीच १६ जानेवारीला मंगळ राशी परिवर्तन होणार आहे. यामुळे जानेवारीच्या सुरुवातीपासूनच काही राशींवर प्रभाव दिसून येऊ शकतो. येणारे नववर्ष म्हणजेच २०२३ हे कर्क, सिंह व कन्या राशीला कसे जाणार आहे हे आपण आजच्या वार्षिक राशिभविष्यातून जाणून घेऊयात..
२०२३ वर्ष कर्क राशीसाठी कसे जाईल? (Cancer Rashibhavishya 2023)
२०२३ हे आगामी वर्ष कर्क राशीच्या मंडळींसाठी धनलाभाचे मोठे योग घेऊन येत आहे. मात्र तुम्हाला आरोग्याच्या बाबत काही तक्रारी जाणवू शकतात. शनिदेव आपल्या राशीत आठव्या स्थानावर गोचर करून स्थिर असतील. हे स्थान आयुष्य व आजार यासंबंधित मानले जाते. तुम्हाला विशेषतः पोट, श्वसन, अगदी साधा सर्दी खोकला सुद्धा दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. अशावेळी शक्य असेल तसा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. २०२३ मध्ये आपल्याला जोडीदाराकडून अपार सुख लाभेल, मात्र वर्षाच्या मध्यंतरी काही कौटुंबिक वाद उद्भवू शकतात. तुम्हाला तज्ज्ञांच्या सहाय्याने गुंतवणुकीतूनच पैसे दुप्पटीने ,मिळण्याची संधी आहे, तुमच्या राशीत सप्तमेष अष्टम या भावात मंगळ असणार आहे, प्रेम संबंध जपल्यास तुमचे मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहू शकेल.
२०२३ वर्ष सिंह राशीसाठी कसे जाईल? (Leo Rashibhavishya 2023)
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या मंडळींना २०२३ मध्ये काही चढ उतार पाहाव्या लागू शकतात. पण जितक्या समस्या जाणवतील त्याहून दुप्पट लाभ होण्याची ही संधी आहे. तुमच्या राशीत शनिदेव गोचर करून सातव्या भावात स्थित होणार आहेत तर गुरु बृहुस्पती हे आपल्या राशीच्या नवव्या स्थानी गोचर करणार आहेत. तुम्हाला येत्या काळात काहीशी मानसिक अशांती अनुभवावी लागू शकते. जी मंडळी लग्नासाठी इच्छुक आहेत त्यांना प्रस्ताव येण्याचे संकेत आहेत मात्र लग्न जुळण्यात काही छोट्या मोठ्या अडचणी येऊ शकतात. गुरूच्या कृपेने यंदा तुम्हाला वर्षात परदेशवारीचे योग आहेत. तुमच्या बॉसच्या मर्जीनुसार तुम्हाला काही आर्थिक लाभ होण्याची संधी आहे.
हे ही वाचा<< मेष, वृषभ, मिथुन राशीला २०२३ वर्ष कसे जाणार? शनिकृपेने ‘या’ दिवसापासून मिळू शकते प्रचंड श्रीमंती
२०२३ वर्ष कन्या राशीसाठी कसे जाईल? (Virgo Rashibhavishya 2023)
२०२३ हे वर्ष कन्या राशीला लाभच लाभ घेऊन येणार आहे. १७ जानेवारीला शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करताच आपल्या राशीच्या प्रभावकक्षेत सहाव्या स्थानी स्थिर होणार आहेत. तर त्याचवेळी गुरु ग्रह आपल्या राशीच्या आठव्या भावात भ्रमण करणार आहे. या येत्या वर्षात आपल्याला नवीन काहीतरी शोधण्याची संधी मिळू शकते. तुम्ही जुन्या आजारांवर आपले मनोबल वाढवून मातही करू शकाल. तुमच्या गुप्त शत्रूंना परिस्थिती तुमचा मित्र बनवू शकेल. येत्या वर्षात कोर्टाच्या कारवाईत तुम्हाला मनाप्रमाणे निकाल मिळण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)