Shani Meen Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनासोबत त्यांचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. शनी ग्रहाला न्याय आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते. शनी जवळपास एका राशीत अडीच वर्षे राहतो. शनीला संपूर्ण राशिचक्र पूर्ण करण्यासाठी ३० वर्षांचा काळ लागतो. सध्या शनी त्याची स्वराशी असलेल्या कुंभ राशीत विराजमान असून २०२५ मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करेल. शनी या राशीत अडीच वर्ष म्हणजेच २०२७ पर्यंत असेल. मीन राशीतील शनीचा प्रवेश मीन राशीच्या व्यक्तींसाठी खूप कष्टदायी असेल. पण काही राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप अनुकूल आणि आर्थिक लाभ देणारा असेल.

शनी करणार मालामाल

कर्क

शनीचा मीन राशीतील राशी परिवर्तन कर्क राशीच्या व्यक्तींना सकारात्मक फळ देणार असेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. नवीन गोष्टीं शिकण्यास प्राधान्या द्याल. काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल.

वृश्चिक

शनीचे मीन राशीतील राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

हेही वाचा: बक्कळ पैसा मिळणार; ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे सप्टेंबर महिना ‘या’ तीन राशींसाठी ठरणार लकी

मकर

२०२५ ते २०२७ हा काळ मकर राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)