Horoscope 2023: नववर्ष सुरु होण्यासाठी आता अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या नववर्षात सुरुवातीपासूनच अनेक ग्रह हे राशी व नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. परिणामी राशीचक्रातील सर्वच राशींवर शुभ- अशुभ प्रभाव दिसून येणार आहेत. अंकशास्त्रानुसार २०२३ या वर्षात ७ हा अंक सर्वच राशींसाठी शुभ ठरणार आहे. येत्या नववर्षात सर्वात शक्तिशाली ग्रह गुरु देव व शनि देव राशी परिवर्तन करणार आहेत. तर जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यातच मंगळ सुद्धा राशी परिवर्तन करणार आहे. या सगळ्याचा प्रभाव काही विशेष राशींना अधिक जाणवू शकतो. आज आपण येत्या वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये शनीच्या प्रिय राशी म्हणजेच मकर, कुंभ व मीन यांच्यावर नेमका कसा प्रभाव असणार आहे हे जाणून घेणार आहोत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०२३ वर्ष मकर राशीसाठी कसे जाईल?

मकर राशीसाठी २०२३ हे फलदायी वर्ष ठरणार आहे. शनिदेव आपल्या राशीच्या प्रभावकक्षेत दुसऱ्या स्थानी स्थिर होणार आहे. यामुळे आपल्याला येत्या काळात अचानक व अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. आपल्याला जोडीदाराच्या बाबत मात्र काहीशी निराशा होऊ शकते. तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात पण तुम्ही अशावेळी खंबीर राहणे गरजेचे असेल. जर तुम्हाला नात्यात एकटं वाटत असेल किंवा कोणी तुमचा फायदा करून घेतंय असं वाटत असेल तर लगेच मागे व्हा. तुम्ही थोडा वेळ स्वतःसाठी घेऊन मग विचारपूर्वक निर्णय घेऊ शकता. २०२३ हे वर्ष नोकरीच्या बाजूने तुमच्यासाठी प्रचंड फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला हव्या त्या कंपनीत नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तुम्हाला संवाद कौशल्यावर काम करण्याची गरज आहे. नोकरीतून व गुंतवणुकीतून दुहेरी धनलाभ होण्याची शक्यता आहे.

२०२३ वर्ष कुंभ राशीसाठी कसे जाईल?

२०२३ या नववर्षात शनि देव १७ तारखेला तुमच्या राशीत गोचर करणार आहे. आपली रास शनिची अत्यंत प्रिय रास आहे त्यामुळेच तुम्हाला या शनि गोचराचा प्रचंड लाभ होऊ शकतो. तुम्हाला येत्या काळात गुरु ग्रहाची सुद्धा साथ लाभणार आहे. शनी व गुरूच्या युतीने आपल्याला प्रेम व नात्यात गोडवा अनुभवता येईल. तसेच आर्थिक बाजूही मजबूत होण्याची पूर्ण संधी आहे. तुम्हाला पराक्रम गाजवण्याची संधी मिळणार आहे त्याला डोळे उघडे ठेवून स्वीकारा. तुमचे आरोग्य २०२३ वर्षात ठणठणीत राहू शकते याहूनही तुम्हाला जुन्या आजारातून मुक्ती मिळण्याचे संकेत आहेत.

हे ही वाचा<< लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ‘या’ ३ राशींना अचानक होणार धनलाभ? २९ डिसेंबरपासून श्रीमंतीचे योग

२०२३ वर्ष मीन राशीसाठी कसे जाईल?

२०२३ हे वर्ष मीन राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. तुम्हाला नोकरी व व्यवसायात प्रचंड लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्हाला वैवाहिक जीवनात चढउतार अनुभवता येतील पण तुमचा जोडीदार या काळात स्वतःचे प्रेम सिद्ध करून दाखवेल असे संकेत आहेत. तुमच्या राशीत गुरु ग्रह प्रभावकक्षेच्या दुसऱ्या स्थानी स्थिर हौणार आहे. यावेळी आपल्या आर्थिक योजना मालात आणल्यास लाभ होण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला पूर्व गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. तुम्हाला व्यवसायात मित्रांची साथ लाभेल. तुमच्या जोडीदारासह काही मतभेद होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)