Shani- Guru Yuti: ज्योतिष तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढील अडीच वर्ष शनिदेव ज्या राशीत स्थिर असणार आहेत, शनिदेव हे कर्मदेवता म्हणून ओळखले जातात, परिणामी २०२५ पर्यंत त्यांचा प्रभाव ज्या राशीवर असेल त्यांना कर्माचे फळ द्विगुणित होऊन मिळू शकते. शनिदेव एप्रिल महिन्यात बृहस्पती गुरु देव यांच्यासह युती करून काही राशींवर धनवर्षाव करणार आहेत. ज्योतिषतज्ञ उल्हास गुप्ते यांच्या माहितीनुसार येत्या २१ एप्रिलला शनी व गुरु युती होणार आहे. यानुसार तीन अशा राशी आहेत ज्यांना पुढील ४५ दिवसात बक्कळ धनलाभ व प्रगतीची संधी उपलब्ध होणार आहे. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होणार हे जाणून घेऊया…
२१ एप्रिलला ‘या’ तीन राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ
सिंह (Leo Zodiac)
सिंह राशीला शनी सप्तम स्थानातून जात आहे. उद्योगधंद्यात भागीदारी, कौटुंबिक सौख्यात अडचणी येतील. पण कुंभेतील स्वगृहीच्या शनीमुळे यातून उत्तम बचाव होईल. मुख्य म्हणजे एप्रिलनंतर होणारा गुरू सहवास खूप मदतीचा ठरेल. या काळात स्वमनाशी होणारा संवाद कठीण समस्याचे रुप साधे सोपे करील. आरोग्य सांभाळा पोटाचे विकार आजार यासाठी पथ्य पाणी आवश्यक ठरेल.
तूळ (Libra Zodiac)
या राशीला शनी पाचवा येत आहे. तूळ- कुंभ या दोन्ही वायूंनी बौद्धीक राशी त्यामुळे विज्ञानशाखेच्या लोकांना या अडीच वर्षात उत्तम संधी प्राप्त होतील. नवे संशोधन नवे विचार पुढे येतील. प्रगतीशील कामे होतील. समाजकार्यांत, राजकारणात संधी प्राप्त होतील. शेअर्स, म्युच्युअल फंड यात केलेली गुंतवणूक फायदेशील ठरेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणात विशेष प्रगती दिसून येईल. २१ एप्रिल रोजी मेष राशीत येणारा गुरू शनीशी शुभयोग करील यातूनच उत्तम कल्पना सुचतील त्या साकार करण्यासाठी पूर्ण वर्षातील काळाचा सदुपयोग करावा.
हे ही वाचा<< शनीदेव २०२५ पर्यंत १२ राशींपैकी कुणाला देणार धनलाभ, कुणाला कष्ट? तुमच्या कुंडलीत लखपती होण्याचा योग आहे का?
वृश्चिक (Scorpio Zodiac)
कुंभेचा शनी वृश्चिक राशीला चतुर्थ स्थानात येतो. कौटुंबिक सुखात होणारे मतभेद पंचमातील गुरु व षष्ठातील राहू वाढू देणार नाहीत पण अति हट्टीपणा हेकेखोरपणाला मुरड घालण्यातच आपले हित आहे. या मंगळाच्या वृश्चिक राशीला शनीचा कायम विरोध राहील. गुरुचे षष्ठातील आगमन २१ एप्रिल २०२३ रोजी होत आहे. त्यातून शनीशी होणारा शुभयोग कौटुंबिक कलह दूर करील. स्थावर इस्टेट मालमत्ता शेती वाडीच्या खरेदीविक्रीतून फायदा होईल. कोर्टकचेरी निकालात यश लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)