Shani Transit 18 March 2023 Shubh Yog: कलियुगातील कर्मदेव, न्यायाधिकारी, दंडाधिकारी मानले जाणारे शनिदेव आज पॉवरफुल रूपात येणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार १८ मार्च २०२३ ला अत्यंत शुभ तिथी जुळून आली आहे. शनीच्या भ्रमणाची सुरुवात आजपासून म्हणजेच फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशीपासून होत आहे. आजची एकादशी ही पापमोचनी म्हणून ओळखली जाते. यासह आज महादेव पूजनाचा शिव योग सुद्धा जुळून आला आहे. शनिदेव या वर्षाच्या सुरुवातीपासून मूळ त्रिकोण राशीत स्थित आहेत. अशावेळी एकादशी व शिव योग असा संयोग जुळून आल्याने काही राशींवर सुख व धनवर्षाव होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे आजपासून तीन महिने शनी कृपा काही राशींवर कायम असणार आहे. शनी यावेळी अत्यंत शक्तिशाली रूपात भ्रमण करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तूळ रास (Libra Zodiac)

मानसिक गोंधळ दूर सारावा. फार काळजी करत बसू नका. लेखक वर्गाला चांगला लाभ मिळेल. बौद्धिक डावपेच खेळाल. सूचक स्वप्न पडू शकेल.तूळ राशीच्या मंडळींना कुटुंबासह मोलाचे काही खास क्षण अनुभवता येईल. अविवाहित व लग्नासाठी उत्सुक मंडळींना मनपसंत स्थळ सांगून येऊ शकते. तुमच्या समाजातील प्रतिष्ठेत भर पडेल. आर्थिक फायद्यासाठी अत्यंत मोठी संधी येईल पण निर्णय अगदी काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे.

मकर रास (Capricorn Zodiac)

शनीदेव मकर राशीच्या मंडळींना आर्थिक बाबींमध्ये प्रचंड यश मिळवून देऊ शकतात. मानसिक ताणतणावातून सुद्धा शनिदेव मुक्त करू शकतात. येत्या काळात आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी सुद्धा मिळू शकते. तुम्हाला अधिकाधिक लाभ हा गुंतवणुकीतून मिळू शकतो. ज्या मंडळींचे काम तेल, पेट्रोल, लोह व सोन्याशी निगडित आहे त्यांच्यावर शनीचा विशेष आशीर्वाद असू शकतो.

हे ही वाचा<< २०२३ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग; ‘या’ राशींना होणार धनलाभ? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा

कुंभ रास (Aquarius Zodiac)

शनिदेव हे मुळातच कुंभ राशीत असल्याने २०२३ चे संपूर्ण वर्ष हे कुंभ राशीसाठी मोठ्या हालचाली घेऊन आले आहे. १८ मार्चला शनिदेव आपल्या राशीत शक्तिशाली स्थळी स्थिर होऊन शश महापुरुष राजयोग साकारणार आहे. येत्या काळात आपल्याला माता लक्ष्मी सह सरस्वतीचा सुद्धा आशीर्वाद लाभू शकतो. आपल्या वैवाहिक जीवनातील बाधा दूर होण्यासाठी हा शुभ काळ ठरू शकतो. जर आपण नव्या नोकरीच्या शोधात असाल तर आपल्याला लवकरच एका हवीहवीशी संधी लाभू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani transit on papmochani ekadashi lucky zodiac signs to get rich huge pay money for three months astrology 18 march svs