कोणत्याही ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा थेट संबंध माणसाच्या जीवनावर पडत असतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. हे संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरते तर काहींसाठी अशुभ. शनि ग्रह ५ जूनला कुंभ राशीमध्ये वक्री झाला होता. यासोबतच तो १३ जुलैला मकर राशीमध्ये वक्री झाला असून २३ ऑक्टोबरपर्यंत येथेच राहणार आहे. याचाच अर्थ असा की शनि १४१ दिवस वक्री अवस्थेत राहील. याचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला तरीही तीन राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या तीन राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
- मेष
तुमच्या संक्रमण कुंडलीवरून शनि ग्रह दहाव्या घरात स्थित आहे. याला नोकरी आणि नोकरीचे घर म्हणतात. त्यामुळे यावेळी तुमची प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढेल. तसेच, तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुम्हाला बढती किंवा वेतनवाढही मिळू शकते. तुम्हाला व्यवसायात चांगला नफाही होऊ शकतो. यासोबतच तुमची कार्यशैलीही सुधारेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. तुम्हाला तुमच्या बॉसचे सहकार्य मिळू शकते. तसेच यावेळी तुम्हाला राजकारणातही यश मिळू शकते. यावेळी तुम्ही निळ्या रंगाचे रत्न परिधान करावेत, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
२४ तासांच्या अंतराने दोन ग्रह एकाच राशीमध्ये करणार संक्रमण; ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार शुभ वार्ता
- मीन
१३ जुलैपासूनचा काळ तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीतून ११ व्या स्थानी मागे गेले आहेत. याला उत्पन्न आणि नफ्याचे घर म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन तुमच्या मिळकतीत वाढ होऊ शकते. या काळात नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. त्याच वेळी, आपण व्यवसायात नवीन सौदे ठरवू शकता. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगले पैसे मिळू शकतात. तसेच व्यवसायात नफाही चांगला होईल. दुसरीकडे, जर तुमचा व्यवसाय किंवा करिअर शनि आणि गुरूशी संबंधित असेल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. यावेळी, तुम्ही पुष्कराज घालू शकता, जो तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो.
- धनु
तुमच्या संक्रमण कुंडलीतून शनिदेव दुसऱ्या स्थानी प्रतिगामी आहे. या घराला पैसा आणि वाणीचे घर म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यासोबतच या काळात तुम्हाला अडकलेले पैसेही मिळू शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तर जे भाषणाशी संबंधित क्षेत्रात कार्यरत आहेत, अशा लोकांसाठी हा काळ शुभ राहील. त्याचबरोबर वाहन आणि जमीन, मालमत्ता यांच्या खरेदी-विक्रीसाठी वेळ अनुकूल आहे. दुसरीकडे, तुम्ही राजकारणात सक्रिय असाल तर या काळात तुम्हाला यश मिळू शकते. तुम्ही पुष्कराज रत्न घालू शकता. जे तुमच्यासाठी भाग्यवान रत्न सिद्ध होऊ शकते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)