Shani Dev Transit 2022: ज्योतिषशास्त्रात शनिला न्यायदेवता व दंडदाता मानले जाते. शनिदेव हे न्यायप्रिय आहेत जे कलियुगात मानवाला आपल्या कर्माचे फळ देण्यासाठी ओळखले जातात. जेव्हा शनि एखाद्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा प्रभाव अन्य ११ राशींवर सुद्धा दिसून येतो. अशावेळी जर अन्य ग्रहणे त्याच राशी प्रवेश घेतला तर त्या युतीने शनिचा प्रभाव आणखी प्रबळ होऊ शकतो. येत्या आठ दिवसात शनी व शुक्र ग्रह मकर राशीत एकाच वेळी संक्रमण करणार आहेत यामुळे सर्वच १२ राशींवर प्रभाव दिसून येऊ शकतो. पण पाच अशा राशी आहेत ज्यांना या शनी- शुक्र युतीचा सर्वाधिक लाभ होऊ शकतो. येत्या काळात या राशींना प्रचंड धनलाभासह श्रीमंतीचे योग तयार होत आहेत.
कधी होणार शनिदेव व शुक्राची युती?
२०२२ च्या शेवटचा महिना सध्या सुरु आहे. या महिन्याच्या २९ तारखेला शनि व शुक्र मकर राशीत एकत्र येणार आहेत. मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत. या महत्त्वपूर्ण युतीने शनि व शुक्राचा शुभ प्रभाव खालील ५ राशींवर दिसून येऊ शकतो.
शनिदेव व शुक्राची युती ‘या’ राशींना देणार धनलाभाची संधी
वृषभ (Taurus)
२९ डिसेंबरला शनि व शुक्र एकत्र येताच आपल्या राशीच्या कुंडलीत भाग्योदयाचे योग आहेत. आपल्याला या काळात वैवाहिक जीवनात प्रेम वाढल्याचे अनुभव येऊ शकतात. धार्मिक कारणांनी तुम्हाला यात्रेचे योग सुद्धा आहेत. या काळात ऑफिस मधील राजकारणापासून दूर राहा. तुमचे सहकर्मचारी तुमच्या विरुद्ध कट करू शकतात पण तुम्हाला वरिष्ठांची साथ लाभू शकते. यामुळेच येत्या काळात तुम्हाला नोकरीत प्रगती व परिणामी प्रचंड धनलाभ होऊ शकतो.
सिंह (Leo)
शनि व शुक्राची युती आपल्यासाठी धनलाभाच्या प्रबळ संधी घेऊन येत आहे. या युतीने सिंह राशीच्या भाग्यात राजयोग तयार होत आहेत. तुमचे शत्रू येत्या काळात वाढू शकतात पण त्यांना तुम्हाला खाली खेचण्यात यश येणार नाही. तुम्ही तुमचे धैर्य सोडू नका. येत्या काळात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते.
तूळ (Libra)
तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव आहेत तर तूळ ही शनिची उच्च रास मानली जाते. या दोघांच्या युतीने आपल्याला अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. तुमच्या प्रलंबित हा काळ शुभ ठरू शकतो. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. तुमचा जवळचा मित्र तुमच्यासाठी लाभदायक संधी ठरू शकतो पण अनावधानाने काही चुका होण्याची शक्यता आहे.
मकर (Capricorn)
मकर राशीतच मुळात शुक्र व शनिदेवाची युती होणार आहे. आपल्याला येत्या काळात प्रचंड धनलाभ होऊ शकतो. आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. तुमचे लक्ष विचलित होऊ शकते पण स्वतःला वेळ देण्यासाठी हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. आपल्याला येत्या काळात जोडीदारासह परदेशवारीचे योग आहेत.
हे ही वाचा<< मेष राशीसाठी २०२३ वर्ष कसे असणार? जूनपर्यंत प्रचंड धनलाभाची संधी, प्रेमाची स्थिती कशी असणार?
मीन (Pisces)
मीन राशीच्या विद्यार्थ्यांना येत्या काळात आपल्या कर्माचे व मेहनतीचे फळ मिळू शकते. आपल्या प्रिय व्यक्तींसह नातं सुधारण्याची शक्यता आहे. लग्न जुळण्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही एक पाऊल पुढे जाऊ शकता.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)