Shani Uday In Meen: नऊ ग्रहांमध्ये शनीला विशेष महत्त्व असते. हा ग्रह न्याय आणि कर्माचा कारक मानला जातो. शनी मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीत शनी तब्बल २.५ वर्षे असतो. त्यामुळे शनीचा प्रभावही अतिशय विशेष मानला जातो. २९ मार्च २०२५ रोजी शनीने स्वराशीतून म्हणजेच कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज बुधवार, ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ५:०३ वाजता शनीचा मीन राशीत उदय झाला आहे. शनीच्या उदयामुळे राशिचक्रावर परिणाम दिसून येईल. त्यामुळे काही राशींच्या मंडळींच्या नशिबाला वेगळीच चमक व झळाळी मिळू शकते. धनदौलतीत प्रचंड वाढ होऊ शकते. अशा या नशीबवान राशी कोणत्या आणि त्यांना नेमका कसा फायदा होऊ शकतो ते पाहू…
शनिकृपेने ‘या’ राशींना मिळेल गडगंज श्रीमंती?
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमच्यासाठी सुखाचे दिवस येऊ शकतात. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. समाजात मान-सन्मान वाढून, तुमच्या कुटुंबात आनंददायी वातावरण तयार होऊ शकते.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय लाभकारी सिद्ध होऊ शकतो. तुमची आर्थिक चणचण दूर होऊन उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांच्या कामात सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. प्रेमसंबंध सुखमय होऊ शकतात.
तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय मोठा लाभ घेऊन येणारा ठरू शकतो. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला राहील, ज्यामुळे पदोन्नतीसह उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना लाभ होऊ शकतो. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही काहीतरी नवीन योजना आखू शकता, जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय चांगले दिवस घेऊन येणारा ठरू शकतो. नशीब या लोकांना प्रत्येक पावलावर साथ देऊ शकते. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होऊन उत्पन्नात वाढ होऊ शकते. पैशाच्या प्रवाहाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. परदेश दौऱ्यावर जाण्याचे योग निर्माण होत आहेत.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय वरदानापेक्षा कमी नाही. शनी देव करिअरमध्ये एकामागून एक मोठ्या प्रगतीच्या संधी घेऊन येऊ शकतात. तुम्हाला अनेक मोठ्या जबाबदाऱ्या मिळणार आहेत, ज्या तुम्ही यशस्वीरीत्या पूर्णही करू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला गवसण्याची शक्यता दिसून येत आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळू शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)