Shani Uday Prabhav: २०२३ च्या सुरुवातीलाच शनीने ३० वर्षांनंतर सर्वात मोठा राशी प्रवेश केला होता. शनिदेव यंदाचं वर्षी स्वराशीत म्हणजेच कुंभ मध्ये स्थिर झाले आहेत. ३० जानेवारीला शनिदेव कुंभ राशीत अस्त झाले होते आणि आता तब्बल ३५ दिवसानंतर उद्या शनिचा उदय होणार आहे. या स्थितीत शनिदेव काही राशींच्या भाग्याचे दार उघडू शकतात तर काहींना येत्या काळात प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागू शकते. १२ राशींपैकी कोणाला लाभ होणार व कोणाला सतर्क राहावे लागणार हे आपण ज्योतिष अभ्यासकांकडून जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनी उदय होताच १२ राशींचे भाग्य कसे पालटणार?

मेष (Aries Zodiac)

मेष राशीच्या मंडळींसाठी शनिदेवाचा उदय हा लाभदायक ठरू शकतो, येत्या काळात तुमच्या करिअरला वेग मिळू शकतो. पदोन्नतीचे योग आहेत. तुम्हाला भावंडांच्या रूपाचे धनलाभ होऊ शकतो.

वृषभ (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या मंडळींना कामाच्या बाबत अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. काही बाबींमध्ये आळस प्रगतीच्या आड येऊ शकतो.

मिथुन (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या मंडळींच्या नशिबाचे दार यंदा उघडणार आहे, वर्षाच्या सुरवातीलाच तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीतून शनीची साडेसाती संपली आहे. येत्या काळात तुम्हाला व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती करता येऊ शकते. स्वतःवर सोडून इतरांवर विश्वास ठेवणे टाळा.

कर्क (Cancer zodiac)

कर्क राशीच्या मंडळींना बेजबाबदार वागून अजिबात चालणार नाही. एखादा जुना आजार डोके वर काढू शकतो. जेवणाकडे लक्ष द्या. पोटाचे स्वास्थ्य बिघडण्याची चिन्हे आहेत.

सिंह (Leo Zodiac)

सिंह राशीच्या मंडळींना भाग्योदय होण्याचे योग आहेत पण आरोग्याबाबत फार काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक कलह टाळावा. कोर्टाच्या खटल्यांमध्ये आपल्याला हवा तसा निर्णय लागू शकतो. व्यवसाय वृद्धीसाठी संपर्क वाढवण्याची वेळ आहे. तुम्हाला स्पर्धकांचा सामना करावा लागेल.

तूळ (Libra Zodiac)

तूळ राशीच्या विद्यार्थी दशेतील मंडळींसाठी येणारा कला लाभदायक ठरू शकतो. तसेच गरोदर महिलांना आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या मंडळींना हृदयाची काळजी घ्यावी लागेल, मानसिक तणावापासून स्वतःला विचारपूर्वक लांब ठेवा. या काळात विनाकारण जबाबदारी घेणे टाळा. तुम्हाला वाहन खरेदीचे उत्तम योग आहेत. आर्थिक लाभासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

धनु (Sagittarius Zodiac)

धनु राशीच्या मंडळींना प्रवासाचे योग आहेत. लहान भावंडांची जबाबदारी उचलावी लागू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी मन जपून काम करावे लागेल. कौटुंबिक प्रेमाने मन शांत राहण्यास मदत होऊ शकते.

मकर (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या मंडळींना कठोर शब्दांपासून स्वतःला दूर ठेवावे, वाणीवर प्रचंड संयमाची गरज आहे, कामात प्रगती लाभेल पण तितकेच हितशत्रु सुद्धा वाढू शकतात. तुमच्या सेव्हिंग्सकडे विशेष लक्ष द्या.

कुंभ (Aquarius Zodiac)

कुंभ राशीच्या मंडळींना आपला अहंकार घातक ठरू शकतो. जाणून बुजून वादापासून लांब राहा. मध्यस्थी करणे सुद्धा टाळा. तुम्हाला शेअर मार्केट गुंतवणुकीतून धनलाभाचे उत्तम योग आहेत.

हे ही वाचा<< १५ मार्चनंतर ७ महिन्यात ‘या’ राशी होतील प्रचंड श्रीमंत? शनिदेव राहूच्या नक्षत्रात राहून देतील धनलाभाची संधी

मीन (Pisces Zodiac)

मीन राशीच्या मंडळींना परदेश यात्रेचे योग आहेत. कामाच्या बाबत लक्ष न दिल्यास किंवा आळस केल्यास नुकसान होऊ शकते. वाहन खरेदी व प्रॉपर्टी विक्रीसाठी येणारा काळ शुभ ठरू शकतो.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani uday in kumbh rashi daily horoscope of 12 zodiac signs when can your zodiac get huge money astrology news svs