Shani Dev Uday In Meen: ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह, १२ राशी व २७ नक्षत्रं महत्त्वाची मानली जातात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळात रोज काही ना काही घडामोडी घडत असतात. एका ठरावीक काळानंतर नऊ ग्रह राशी परिवर्तन करतात. त्यांच्या गोचर भ्रमणामुळे प्रत्येक व्यक्तीला अनुकूल किंवा प्रतिकूल फळं मिळतात. नऊ ग्रहांमध्ये शनीला विशेष महत्त्व असतं. हा ग्रह न्याय आणि कर्माचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार २०२५ हे वर्ष अनेकांसाठी गेम चेंजर ठरणार असून, शनीचं मोठं संक्रमण मार्च महिन्यात झालं आहे. २९ मार्च या दिवशी तब्बल अडीच वर्षांनंतर शनीनं राशिबदल केलाय. २९ मार्च रोजी रात्री ११:०१ वाजता शनीनं मीन राशीत प्रवेश केला आहे. आता शनी देव ३० वर्षांनंतर ४ एप्रिल रोजी मीन राशीत उदयास येणार आहे. त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनी देवाचा उदय काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो. जाणून घेऊ त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते, ज्यांना शनी देवामुळे सकारात्मक परिणामांचा लाभ मिळू शकतो.
‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा?
मिथुन (Mithun)
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या उदयामुळे मिथुन राशीच्या लोकांचे सुखाचे दिवस सुरू होऊ शकतात. ज्योतिषीय अभ्यासकांच्या माहितीनुसार, या राशीच्या व्यक्तींना लाभदायक फायदे मिळू शकतात. आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी येण्याची शक्यता असून, त्यासह तुमच्या धनलाभाचेसुद्धा योग जुळून येऊ शकतात. आपल्याला व्यवसायासाठी आवश्यक भांडवल सहज प्राप्त होऊ शकते. कामाच्या ठिकाणी नवनवीन संधी आपले दार ठोठावू शकतात. तुमचे वास्तव्याचे ठिकाण पुढील काही काळासाठी बदलण्याची शक्यता आहे. या कालावधीत आत्मविश्वास वाढल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी मिळू शकते.
वृषभ (Taurus)
शनीची स्थिती वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. या राशीला येत्या काळात प्रचंड मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांना त्यांच्या वाणीच्या माध्यमातून लाभ संभवतो. प्रेमसंबंध व नाती सुधारून गैरसमज दूर होऊ शकतात. या काळात आपल्याला व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. आपल्याला कार्यस्थळी मान-सन्मान लाभण्याची शक्यता आहे. जर तुमचे काम एखाद्या परदेशी कंपनीशी संबंधित असेल, तर तुम्हाला येत्या काळात बोनस रूपात प्रचंड धनलाभ होऊ शकतो. तुम्ही शेअर बाजारात गुंतवणुकीतून अपार संपत्तीचे धनी होऊ शकता. या राशीच्या व्यक्तींना समाजात आदराचं स्थान मिळू शकतं.
धनू (Sagittarius)
ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या उदयामुळे धनू राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात. तुमच्या सर्व मनोकामना शनी देवाच्या कृपेने पूर्ण होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात तुम्हाला घवघवीत यश मिळू शकतो. बरेच दिवस अडकलेले पैसे तुम्हाला या काळात परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत तुम्हाला लाभण्याची शक्यता आहे. सुख सुविधांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमचा इच्छित जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)