Shani uday in meen rashi: ज्योतिषशास्त्रानुसार शनी देव अडीच वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि दर सहा महिन्यानंतर अस्त किंवा उदय या अवस्थेत प्रवेश करतो. ज्याचा १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे परिणाम पाहायला मिळतो. एप्रिलमध्ये शनीदेवाचा मीन राशीत उदय होणार आहे, या राशीचे स्वामी देव गुरू बृहस्पती आहेत. शनीचा मीन राशीत उदय काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल.
तीन राशींची होणार चांदी
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीचा मीन राशीतील उदय खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या कामातील सर्व अडचणी दूर होतील आणि आयुष्यात आनंदी आनंद संचारेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. आयुष्यात सुख-शांती येईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल.
धनु
धनु राशीसाठीही शनीचा मीन राशीतील उदय लाभदायी ठरेल. तुमच्या करिअरमधील अडचणी दूर होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी चांगली संधी प्राप्त होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल.
कुंभ
कुंभ राशीसाठी शनीचा उदय अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमचे भाग्य चमकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)