वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीदेवाला न्यायप्रिय आणि कर्मफळाचा दाता मानलं जातं. त्यामुळे जेव्हा शनिदेवाच्या चालीमध्ये बदल होतो, त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर झाल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता शनिदेव ५ जून रोजी वक्री होणार आहेत. यावेळी शनिदेवाचे वक्री होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कारण शनिदेव स्वतःच्या राशीत वक्री होणार आहेत. शनीदेवाच्या वक्री चालीमुळे ३ राशींना खूप फायदा होण्याची शक्यता आहे. त्या ३ राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मकर राशी –
मकर राशीतील लोकांना शनीची वक्री चाल अनुकूल ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीच्या दुसऱ्या स्थानी वक्री होणार आहेत. ते तुमचे लग्न स्वामी आहेत. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. यासोबतच मकर राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. लोक तुमच्या कामाचे कौतुक करण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होण्यासाह बोलणे प्रभावी ठरु शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायक ठरु शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारु शकते तर व्यापारी वर्गाला अडकलेले पैसे मिळू शकतात.
हेही वाचा- संकष्टी चतुर्थीला शनीदेव तुम्हालाही करू शकतात कोट्याधीश; ‘या’ राशींना लाभू शकते गणपतीचे वरदान
मेष राशी –
शनीची वक्री चाल मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. कारण शनीदेव तुमच्या गोचर कुंडलीच्या ११ व्या स्थानी वक्री होणार आहेत. यासोबतच शनिदेव दहाव्या घराचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तर कामाच्या ठिकाणी नोकरदार वर्गाची कामगिरी उत्कृष्ट राहू शकते. आतापर्यंत यशाच्या मार्गात जे अडथळे येत होते ते दूर होऊ शकतात. त्याचबरोबर बेरोजगारांना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.
वृषभ राशी –
शनीची वक्री चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शनीदेव तुमच्या राशीतून दहाव्या स्थानी वक्री होणार आहेत. शिवाय ते नवव्या घराचेही स्वामी आहेत. त्यामुळे यावेळी तुमच्या उपजीविकेच्या साधनांमध्ये वाढ होऊ शकते. या काळात तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. व्यावसायिकांना या काळात नवीन ऑर्डर मिळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला नफा मिळू शकतो. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)