ज्योतिष शास्त्रात ग्रह, कुंडली आणि राजयोग यांना खूप महत्त्व दिले जाते, परंतु सर्व ग्रहांमध्ये शनिदेवाची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते. असे म्हणतात की, शनि दयाळू झाला तर माणसाचे नशीब क्षणार्धात बदलते. शनिदेवांना कर्माचा दाता म्हणतात. ते माणसाला त्याच्या कर्मानुसार योग्य फळ देतात. शनिदेव मनुष्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे फळ देतात. म्हणूनच त्यांना कलियुगाचा दंडाधिकारी असेही म्हणतात. आता सध्या शनिदेव प्रतिगामी अवस्थेत भ्रमण करत आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत शनिदेव याच अवस्थेत असतील. त्यामुळे काही राशींच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने बक्कळ धननलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ पाच राशींचे भाग्य उजळणार?
मेष राशी
राशीच्या लोकांसाठी शनीची प्रतिगामी चाल खूप फलदायी ठरु शकते. यावेळी तुमचे अडकलेले आणि दिलेले पैसे परत मिळवू शकता. भागीदारीत काम करणाऱ्यांना या काळात चांगले यश मिळू शकते. यावेळी नशीब तुम्हाला प्रत्येक कामात साथ देऊ शकते.
(हे ही वाचा : २ ऑक्टोबरपासून ‘या’ पाच राशींना मिळेल अपार धन? केतू-मंगळदेवाच्या युतीमुळे होऊ शकता लखपती )
मिथुन राशी
प्रतिगामी शनिदेव असल्याने मिथुन राशीच्या लोकांना अचानक धनप्राप्ती होऊ शकते. यावेळी तुम्ही व्यवसायात मोठी डील फायनल करू शकता. ज्याचा लाभ तुम्हाला भविष्यात मिळू शकेल. तसेच जे काम तुम्ही थांबवले होते ते पूर्ण करता येऊ शकते.
सिंह राशी
प्रतिगामी शनि सिंह राशीच्या लोकांना चांगले फळ देऊ शकतो. या राशीतील मंडळीला गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला करिअरशी संबंधित खूप चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना यश मिळू शकतो. बऱ्यापैकी आर्थिक लाभ होऊ शकतो.
(हे ही वाचा : सर्वपित्री अमावस्येला दूसरे सूर्यग्रहण ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून चमकवणार? पितरांच्या कृपेने येऊ शकतात सुखाचे दिवस )
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांसाठी शनिची कृपा मोठा लाभ देऊ शकते. या काळात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. या राशींच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी शनीची प्रतिगामी चाल लाभदायक ठरु शकते. या काळात या राशीच्या नोकरदार लोकांना चांगली बातमी मिळू शकते. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. व्यवसायातही फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)