ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी शनी स्वतःची राशी कुंभमध्ये विराजमान झाला आहे. तर १७ जून रोजी शनी या राशीत उलटा फिरणार आहे. १७ जून २०२३ रोजी रात्री १० वाजून ४८ मिनिटांनी शनी कुंभ राशीमध्ये उलट दिशेने फिरण्यास सुरुवात करेल आणि ४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजून २६ मिनिटांनी तो पुन्हा मागे फिरेल. शनीची वक्री चाल अनेक राशींसाठी अशुभ ठरु शकते, परंतु अशा अनेक राशी आहेत ज्यांना शनीच्या उलट्या चालीमुळे धनलाभासह आणि सुख-समृद्धी येऊ शकते. त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
सिंह राशी –
सिंह राशीमध्ये शनी कुंभ राशीत वक्री होऊन सातव्या स्थानी राहणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात लाभ होऊ शकतो. अनेक दिवसांपासून थांबलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. शिवाय या काळात तुमच्या व्यवसायात भरपूर नफा होण्याची शक्यात आहे. कष्ट करणाऱ्यांना पूर्ण यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनाही यश मिळू शकते.
हेही वाचा- १२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग ‘या’ राशींना बनवणार गडगंज श्रीमंत? गुरुदेव देऊ शकतात लाखोंचा धनलाभ
धनु –
शनीचं कुंभ राशीतील वक्री होणं धनु राशीच्या शुभ ठरु शकते. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. शिवाय कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची प्रशंसाही होऊ शकते. भावंडांमध्ये प्रेम वाढू शकते. प्रवास घडण्याचीही दाड शक्यता आहे.
मकर –
हेही वाचा- ‘या’ लोकांच्या जीवनात कधीही पैशांची कमतरता भासत नाही? आयुष्यात खूप श्रीमंत होण्याचा असतो योग
या राशीमध्ये शनी दुसऱ्या स्थानी असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती थोडी मजबूत होऊ शकते. यासोबतच तुम्हाला प्रॉपर्टीशी संबंधित गोष्टी विकायच्या असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. यासोबतच या काळात मालमत्ता खरेदी करणेही शुभ ठरू शकते. कुटुंबासोबत आनंदी जीवन घालवू शकता. मात्र, यावेळी तुमच्या बोलण्याकडे थोडे लक्ष द्या.
मीन –
कुंभ राशीत वक्री झाल्यानंतर शनी मीन या राशीच्या बाराव्या स्थानी राहणा आहे. त्यामुळे या काळात मीन या राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यवसायातही प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच छोट्या व्यावसायिकाला पैशाची कमतरता भासू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)