Shani Dev Vakri in Kumbh: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह गोचरसोबत वक्री आणि मार्ग्रस्थ देखील होतात.  शनि प्रत्येक राशीत खूप संथ गतीने प्रवास करतो, तो एका राशीत किमान अडीच वर्षं राहतो. इतका काळ शनि एकाच राशीत असला तरी त्याची स्थिती सतत बदलत असते. एका राशीत परत येण्यासाठी साधारण ३० वर्षांचा कालावधी लागतो. शनी सध्या त्याच्या मूळ कुंभ राशीत आहे. आता शनिदेव २९ जून २०२४ रोजी पूर्वगामी म्हणजेच वक्री होणार आहे. वक्री म्हणजे उलट चाल होय. नोव्हेंबर पर्यंत शनिदेव याच स्थितीत राहणार आहेत. शनि ग्रह १३९ दिवस वक्री राहणार आहे. शनिदेवाच्या वक्री स्थितीमुळे काही राशींना अपार पैसा, सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. शनिच्या चालीमुळे कोणत्या राशींवर शुभ परिणाम होणार आहे, ते जाणून घेऊयात…

शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचे भाग्य उजळणार?

मेष राशी

शनिदेवाची वक्री चाल मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : देवगुरुच्या कृपेने २११ दिवस ‘या’ राशींच्या लोकांचे घर धन-धान्यांनी भरणार? २०२५ पर्यंत अपार श्रीमंतीसह लाभेल समृद्धी )

मिथुन राशी

शनिदेवाची वक्री चालीमुळे मिथुन राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रातही फायदा होऊ शकतो. यावेळी प्रमोशनसह पगार वाढू शकतो. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्या संपत्तीत वाढ करु शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल.

तूळ राशी

शनिदेवाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकतो. या काळात नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. समाजातही तुम्हाला मान-प्रतिष्ठा लाभण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)