Shani Dev Vakri in Kumbh: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनुसार त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असं म्हटलं जातं. ग्रहांची वक्री स्थिती उलट गतीशी संबंधित असते, तर थेट गतीला ग्रहाची मार्गी गती म्हणतात. शनिदेव सर्वात मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तसेच एका राशीत ३० वर्षांनी शनिदेव येतात. शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीमध्ये उपस्थित आहेत. शनिदेव वक्री झाले आहेत. १५ नोव्हेंबर पर्यंत शनिदेव याच स्थितीत राहणार आहेत. त्यामुळे येणारे चार महिने काही राशींच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारे ठरु शकतात. या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींना प्रचंड श्रीमंती देणार शनैश्वर महाराज?

मेष राशी

शनिदेवाची वक्री चाल मेष राशीच्या लोकांसाठी बंपर फायदा घेऊन येणारी ठरु शकते. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख, संपत्ती आणि समृद्धीची शक्यता निर्माण होत आहे. या काळात तुम्हाला कोणत्याही कामात चांगले यश मिळू शकते. तसेच व्यवसाय आणि नोकरीत चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. कामात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. यावेळी तुमच्यासाठी उत्पन्नाचे अधिक स्रोत निर्माण होऊ शकतात.

(हे ही वाचा: १८ दिवसांनी ग्रह राजा करणार मोठी उलाढाल; ‘या’ राशी होणार मालामाल? सूर्यदेव गोचर अवस्थेत बलवान होताच होऊ शकतात लखपती )

वृषभ राशी

शनिदेवाच्या वक्री चालीमुळे वृषभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. येणारे दिवस या राशींच्या घरात शनिदेवाच्या कृपेने चांगला पैसा येऊ शकतो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकतो. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता असून घरात नवीन वाहन येण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

शनिदेवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. या काळात नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. तसेच यावेळी तुम्हाला कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. तुम्ही नवे वाहन खरेदी करू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)