Shani Vakri 2024 : शनि या वेळी कुंभ राशीमध्ये विराजमान आहे. शनि कुंभ राशीमध्ये ३० जूनला वक्री होणार आहे म्हणजेच उलट चाल चालणार आहे. शनि हा सर्वात हळूवार वेगाने चालणारा ग्रह आहे. शनिच्या वक्री चाल काही राशींसाठी शुभ असते तर काही राशींसाठी अशुभ असते. ज्योतिषशास्त्रानुसार शनि वक्री होताच राशीचक्रातील चार राशींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्या चार राशी कोणत्या, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मेष राशी (Aries)

शनि वक्री होत असल्यामुळे मेष राशीच्या लोकांचे करिअर आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या करिअर आणि व्यवसायावर होऊ शकतो. या लोकांनी या दरम्यान सावध राहावे आणि कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावा. जर या लोकांना कोणत्याही कामात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अधिक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा : २८ जून पंचांग: सौभाग्य योग १२ राशींच्या पदरी टाकणार ‘असं’ फळ; आर्थिक बळ ते वैवाहिक सौख्य, कसे असेल आजचे भविष्य?

वृषभ राशी (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांना शनिच्या वक्री चालीमुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या लोकांना कोणतेही काम करताना अडचणी येऊ शकतात. मनाप्रमाणे यश मिळण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. जे लोक व्यवसाय करतात त्यांच्या वाटेला जास्त समस्या येऊ शकतात. या दरम्यान या राशीच्या लोकांना कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू नये.

मिथुन राशी (Gemini)-

मिथुन राशीच्या लोकांना या दरम्यान नशीबाचा साथ मिळणार नाही. या काळात या लोकांनी महत्त्वाची कामे करणे टाळावीत. या लोकांच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. या लोकांचे अनेक कामे थांबू शकतात. या दरम्यान या लोकांचा खर्च गरजेपेक्षा वाढू शकतो. त्यामुळे या राशीच्या लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

हेही वाचा : पैसाच पैसा! २०२५ पर्यंत ‘या’ राशींवर असेल गुरूची कृपा! करिअरमध्ये होईल चांगली प्रगती, जोडीदाराबरोबरचे नातं होईल दृढ

कन्या राशी (Virgo)

कन्या राशीच्या लोकांना या काळात न्यायालयीन कामांमध्ये उशीर होऊ शकतो. या लोकांचे शत्रू त्यांच्या कामात अडथळा निर्माण करू शकतात. या दरम्यान शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे टाळा. कन्या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यव्हार टाळावेत.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)