Shani Vakri 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये शनिला कर्माचा दाता म्हटले जाते. हा ग्रह कर्मानुसार व्यक्तीला फळ प्रदान करतो. शनिचा संबंध अनुशासन, व्यावहारिकता, संरचना, कायदा आणि सामाजिक न्यायाशी जोडलेला आहे. त्यामुळे शनिच्या स्थितीमध्ये साधारण बदल व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम करतो.
जवळपास ३० वर्षानंतर शनि मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि २०२७ पर्यंत याच राशीमध्ये विराजमान राहणार आहे. या दरम्यान जेव्हा ते वक्री होणार तेव्हा उलट चाल चालणार. त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. १३ जुलै सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांनी शनि मीन राशीमध्ये वक्री करणार आहे. या परिवर्तनाचा थेट सकारात्मक परिणाम काही राशींवर दिसून येईल. या वेळी काही राशींना सतर्क राहण्याची सुद्धा आवश्यकता आहे. जाणून घेऊ या त्या कोणत्या राशी आहेत. ज्यांना या दरम्यान लाभ मिळू शकतो.

कन्या राशी (Virgo Rashi)

शनि या राशीच्या सातव्या भावात वक्री होणार आहे. याचा परिणाम कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. नोकरीमध्ये या लोकांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसायात या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेन. नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. प्रेम जीवनात सुख समृद्धी नांदेल. काही लोक विवाहाचा निर्णय घेऊ शकतात. शिक्षण आणि रिअल इस्टेट क्षेत्रात लाभ शक्य आहे. नवीन वाहन किंवा घर खेदी करण्याचे योग जुळून येत आहे. शिस्त आणि धैर्याने प्रत्येक कार्यात यश मिळू शकते.

मकर राशी (Capricorn Rashi)

मकर राशीच्या लोकांसाठी शनिची वक्री चाल शुभ संकेत देणारी ठरू शकते. शनि या राशीच्या तिसर्‍या भावात वक्री करणार आहे. हळू हळू या लोकांना नशीबाची साथ मिळू शकते. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. साडेसातीपासून दिलासा मिळू शकतो. त्यामुळे मानसिक तणाव कमी होईल. संवाद, नेटवर्किंग आणि धाडसीपणा वाढेल. या लोकांची वाणी अधिक प्रभावशाली होईल ज्यामुळे अनेक क्षेत्रात यश मिळू शकते. लहान भाऊ बहि‍णींना आणि जवळच्या मित्रांना सहकार्य मिळू शकते. यात्रांपासून लाभ मिळू शकतात. शनिच्या दृष्टीने आता नात्यात अडचणी कमी होऊ शकतात.

मीन राशी (Pisces Rashi)

मीन राशीच्या लोकांसाठी शनिची वक्री स्थिती विशेष फळदायक ठरू शकते. कारण शनि या राशीच्या लग्नभावात वक्री करणार. आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि ऊर्जेचा अनुभव होऊ शकतो. आत्मचिंतन आणि आत्मविश्वासाची प्रवृत्ती वाढेन. सामाजिक जीवनात सक्रियता आणि प्रभाव दिसून येईल. विदेशात नोकरी व व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. जोडीदाराबरोबरचे संबंधामध्ये आणखी गोडवा दिसून येईल. करिअरमध्ये पुढे जाण्याचे योग जुळून येईल. संयम आणि धैर्याने केलेल्या कामात यश मिळू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)