Shani Vakri: कर्मदाता शनिदेव हे कलियुगातील दंडाधिकारी म्हणून ओळखले जातात. २०२३ हे वर्ष शनीच्या महत्त्वाच्या उलाढालींनी समृद्ध असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच १७ जानेवारीला शनिदेव तब्बल ३० वर्षांनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत स्थिर झाले आहेत. तर १५ मार्च रोजी शनीचा पुन्हा एकदा कुंभ राशीत उदय झाला आहे.
द्रिक पंचांगाच्या माहितीनुसार, येत्या १७ जूनला शनिदेव वक्री होणार आहेत. विशेष म्हणजे पुढील १४० दिवस शनिदेव वक्रीस्थितीत असणार आहे. १७ जून २०२३ ला शनिवार असल्याने हा अत्यंत शुभ योग जुळून येणार आहे. सकाळी १० वाजून ५६ मिनिटांनी शनिदेव वक्री होणार आहे. तत्पूर्वी १७ जून पर्यंत म्हणजेच पुढील दोन महिने काही राशींवर शनीचा प्रभाव दिसून येणार आहे. योगायोगाने या राशीच्या शनीच्या आवडत्या राशी असल्याने हा प्रभाव शुभ असणार आहे. इतकंच नाही तर शनीच्या या राशींना प्रचंड प्रगतीचे सुद्धा योग आहेत. या राशी कोणत्या हे पाहूया…
मकर रास (Capricorn Zodiac)
२१ एप्रिलला गुरूने चतुर्थातील मेष राशीत प्रवेश केला की गुरू, राहू, हर्षल, रवी आणि बुध अशी पंचग्रही मेषेत असतील. याचा प्रभाव मकर राशीत सुद्धा दिसून येऊ शकतो. शनीच्या प्रभावाने मानसिक संतुलन साधणे कठीण जाईल. तोल जाऊ देऊ नका. आतापर्यंतचा संयम तसाच ठेवणे महत्वाचे आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी देखील आपल्या शब्दाने घोळ वाढू शकतो. विद्यार्थी वर्गाला मेहनातीसह चिकटीची देखील गरज भासेल. षष्ठातील शुक्र व शनी आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करेल व भरपूर धनसंपत्ती मिळू शकते.
कुंभ रास (Aquarius Zodiac)
२१ एप्रिलला झालेला गुरूचा राशी बदल आपल्यासाठी अतिशय लाभकारक आहे. त्यासह शनीच्या प्रभावाने परदेशाशीसंबंधित कामांना गती मिळेल. अर्थात तसे प्रयत्न देखील व्हायला हवेत. कला, क्रीडा आणि बौद्धिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवाल. नोकरीतील कामकाज धिम्या गतीने पुढे सरकेल. व्यावसायिकांचा वेग मात्र चांगला असेल. आर्थिक उन्नती करणारे ग्रहयोग आहेत. पित्त आणि डोकेदुखीचा त्रास आटोक्यात ठेवावा. अन्यथा दुखणे वाढेल.
हे ही वाचा<< शनीच्या कृपेने ५०० वर्षाने ‘केदार योग’ जुळून आला; ‘या’ ३ राशींना कोट्याधीश होण्याची प्रबळ संधी
मीन रास (Pisces Zodiac)
मीन ही मूलतः शनीची रास नाही, गुरु देव या राशीचे स्वामी आहेत. पण २१ एप्रिल नंतरच गुरुचा राशी बदल व योगायोगाने शनीसह एकत्रित प्रभावाने मीन रास समृद्ध होण्याची शक्यता आहे. परिस्थितीत सुधारणा होईल. आत्मविश्वासाने आगेकूच कराल. महत्वाचे निर्णय घेताना त्याचे होणारे परिणाम देखील विचारात घ्यावेत. नोकरीतील सहकारी वर्गाकडून विशेष साथ मिळेल. व्यवसाय, उद्योगात नवी भरारी घ्याल. व्यावसायिक नाते संबंध जपल्याने अनेक जण मदतीला येतील. जोडीदाराच्या समयसूचकतेमुळे मोठे नुकसान टळेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)