Surya Transit 2023: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सूर्यदेव हे यश, आत्मविश्वास, मानसिक बळ, नोकरी, नेतृत्व यांचे कारक मानले जातात. सूर्याच्या कुंडलीतील स्थितीनुसार तुमच्या राशीच्या भाग्यात अनेक बदल घडत असतात. येत्या १५ जून ला तब्बल एका वर्षाने सूर्यदेव राशी बदल करून बुध ग्रहाच्या राशीत म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. मिथुन राशीतील सूर्य गोचर हे ३ राशींसाठी अत्यंत लाभदायक व शुभ असणार असल्याचे अंदाज आहेत. सूर्य गोचराच्या दोनच दिवस नंतर म्हणजेच १७ जून ला शनी सुद्धा वक्री होणार आहेत. शनी व सूर्याच्या प्रभावाने या मंडळींना अचानक धनलाभासह नोकरी व व्यवसायात मोठे यश प्राप्त होऊ शकते. आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा अनपेक्षित बदल घडून येण्याची चिन्हे आहेत. सूर्य गोचर नक्की कोणत्या राशींना फायदेशीर ठरू शकते याविषयी जाणून घेऊया…
सूर्य गोचर- शनी वक्री होताच चमकणार ‘या’ राशींचे नशीब ?
मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope Today)
सूर्य गोचर होताच मिथुन राशीच्या मंडळींचा लाभदचा काळ सुरु होऊ शकतो तर शनीच्या वक्री होण्याने तुमचे नशीब बदलण्याची संधी वेगाने तुमच्याकडे येऊ शकते. या मंडळींचा आत्मविश्वास पुढील काही महिने सर्वाधिक सु शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ व उच्च पदावरील अनेक अधिकाऱ्यांशी बोलण्याची वेळ येऊ शकते पण तुम्ही तुमच्या ओघवत्या वक्तृत्वाने व आत्मविश्वासाने या मंडळींचा विश्वास जिंकून घेऊ शकता. तुम्हाला अनपेक्षित मार्गातून पैसे मिळण्याचे योग आहेत. अडकलेले धन परत मिळू शकते. आरोग्यात सुधारणेची चिन्हे आहेत.
तूळ रास (Libra Zodiac Horoscope Today)
सूर्याचे राशी परिवर्तन हे तूळ राशीच्या मंडळींना एक ना अनेक मार्गातून प्रचंड यश व राजेशाही जीवन अनुभवण्याची संधी देऊ शकते. तुम्ही सुरु केलेल्या प्रत्येक कामामध्ये यशाची चिन्हे आहेत. घरामध्ये एखादे धार्मिक कार्य आयोजिले जाऊ शकते. खर्चाचा भार जरी वाढला तरी यातून मिळणारे सुख व समाधान आपल्यासाठी मोलाचे ठरू शकते. तुम्हाला आरोग्याच्या बाबत विशेष फायदा होण्याची चिन्हे आहेत. डोळ्यांची काळजी घ्यावी.
हे ही वाचा<< १८ महिने गुरु ग्रह ‘या’ राशींचे आयुष्य सोनपावलांनी बदलणार? कोणत्या टप्प्यावर सर्वाधिक धनलाभाची संधी, जाणून घ्या
कुंभ रास (Aquarius Zodiac Horoscope Today)
कुंभ राशीत २०२३ मध्ये सर्वाधिक उलाढाली होत आहेत. शनीदेव सध्या आपल्याच राशीत स्थिर आहेत व १७ जूनला कुंभेतच शनी वक्री सुद्धा होणार आहे. अशातच सूर्याचा प्रभाव तुमच्या राशीत ग्रहांची ताकद वाढवू शकतो. शनी आपल्या राशीचे स्वामी असल्याने येत्या काळात तुम्हाला शुभ लाभ होण्याची चिन्हे आहेत. जुन्या गुंतवणुकींकडे एकदा लक्ष द्यावे लागेल ज्यातून तुम्हाला येत्या काळात मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची अपेक्षा आहे. पैसे आल्याने एखादी मोठी समस्या सुद्धा दूर होऊ शकते. तुम्हाला जोडीदाराचे खूप प्रेम मिळण्याची ही वेळ आहे. तुमच्या रूपात इतरांना दोन क्षण सुख अनुभवायला मिळू शकते ज्यामुळे तुम्ही या कालावधीत खूप समाधानी राहू शकता.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)