Saturn Transit 2023 Effects: प्रत्येक ग्रह हा वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. यामध्ये शनिदेवाचे गोचर हे सर्वात महत्त्वाचे व प्रभावशाली मानले जाते. ज्योतिष अभ्यासक सांगतात की, शनी हा अत्यंत संथ गतीने प्रवास करणारा ग्रह आहे त्यामुळे त्याला गोचर पूर्ण करण्यासाठी साधारण अडीच ते साडे सात वर्ष लागतात. यंदा १७ जानेवारीला शनिदेव आपल्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभ मध्ये स्थिर झाले आहेत. काही दिवसांनी शनीचा कुंभ राशीतच उदय झाला होता. आणि आता शनी येत्या काही दिवसात वक्री होणार आहे. यामुळे शनीचा शश महापुरुष राजयोग आणखी शक्तिशाली होणार आहे. परिणामी पुढील ३० महिने काही राशींना प्रचंड लाभाचे ठरू शकतात. या पाच भाग्यवान राशींना कुंडलीत कशाप्रकारे धनलाभू शकते हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिदेव या राशींना देणार प्रचंड पैसे?

वृषभ रास (Taurus Zodiac)

शनीने गोचर करत बनवलेला शश राजयोग हा वृषभ राशीसाठी एक नवी सुरुवात ठरू शकतो. या राशीच्या मंडळींना यशाची शिखरे पादाक्रांत करता येतील. तसेच पदोन्नतीसह पगारवाढीचे सुद्धा संकेत आहेत. मिळकतीत वाढ झाल्याने खर्च सुद्धा वाढू शकतात. कला, लेखन, मीडिया व शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभाचे योग तयार होत आहेत.

मिथुन रास (Gemini Zodiac)

शनीने बनवलेला शश महापुरुष राजयोग हा मिथुन राशीसाठी नशिबाचे दार उघडणारा ठरू शकतो. या राशीला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळू शकते ज्यामुळे धनलाभ होण्याचे योग आहेत. धनप्राप्ती झाल्याने तुम्हाला गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी लाभू शकते. तसेच फार काळापासून लांबणीवर पडलेली खरेदी सुद्धा करता येऊ शकते. जीवनात वैभव अनुभवण्याची संधी देणारा हा राजयोग असणार आहे.

तूळ रास (Libra Zodiac)

शनीने तूळ राशीवर आपली कृपा दृष्टी दाखवण्याचा हा काळ असू शकतो. यामुळे जुन्या समस्या मार्गी लागू शकतात. प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जीवनात धन- वैभव व आनंद अनुभवता येऊ शकतो. त्यासह तुमच्या प्रेम जीवनाला सुद्धा नवा बहार मिळू शकतो. नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. तसेच उधार दिलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळू शकतात.

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीसाठी शनीचे गोचर हे वरदान सिद्ध होऊ शकते. भागीदारीत केलेले व्यवसाय तुम्हाला मोठा धनलाभ मिळवून देऊ शेतात. नोकरदार मंडळींना वरिष्ठांच्या मर्जीत राहण्यासाठी संधी मिळू शकते. यावेळी आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा सुधारणेची शक्यता आहे. प्रॉपर्टी व सोन्यामध्ये गुंतवणूक लाभदायक ठरू शकते.

हे ही वाचा<< ७२ तासांनी गुरुपुष्यामृत योग ‘या’ राशींना बनवणार कोट्याधीश? गुरु उदय देऊ शकतो नशिबाला कलाटणी

कुंभ रास (Kumbh Zodiac)

शनीने ३० वर्षांनी आपल्या मूळ राशीत प्रवेश घेतला आहे त्यामुळे कुंभ राशीत साडेसाती सुरु आहे. पण शनी हे कुंभेचे स्वामी असल्याने या राशीला कष्ट सहन करावे लागणार नाहीत असे दिसतेय. शनीने तुमच्या गोचर कुंडलीत लग्न स्थानी शश राजयोग बनवल्याने तुम्हाला प्रचंड प्रगती, धनलाभ व वैभव लाभू शकते. तुमच्या सुप्त इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ असू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani vakri will give huge money to these five zodiac signs shash mahapurush rajyog in kundli will make you crorepati astrology svs