Saturn-Venus Yuti 2024: ज्योतिषशास्त्रात नवग्रहांतील ग्रहांची काही ग्रहांबरोबर मित्रता तर काही ग्रहांबरोबर शत्रुत्व असते. बऱ्याचदा एका राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रहांनी प्रवेश केल्यामुळे युती निर्माण होते. डिसेंबरमध्ये कर्मफळदाता शनी आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्राची युती निर्माण होणार आहे. ही युती कुंभ राशीमध्ये तब्बल ३० वर्षानंतर बनणार असून याच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना अनेक फायदे होतील. या व्यक्तींच्या आयुष्यात मान-सन्मानासह , धनलाभ होण्याचीही दाट शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

शनी आणि शुक्राचा संयोग वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.

वृश्चिक

शनी आणि शुक्राची युतीमुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अनेक आर्थिक लाभ होतील. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल.

हेही वाचा: तब्बल १२ वर्षानंतर दिवाळीआधी गुरू चालणार उलटी चाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

मकर

मकर राशीच्या व्यक्तींना शनी आणि शुक्राची युती प्रत्येक कामात यश मिळवून देईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल. परदेश जाण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबाची आर्थिक परस्थिती अधिक मजबूत होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani venus conjunction after 30 years of the alliance of planets in aquarius the fortune of these three zodiac signs will shine sap