Hindu New Year 12 Zodiac Signs Horoscope Today: आज हिंदू नववर्षातील पहिला दिवस. २२ मार्च २०२३ म्हणजेच गुढीपाडव्यापासून श्री शालिवाहन शके १९४५ शोभन नाम संवत्सर प्रारंभ झाला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच शनिने कुंभ राशीत शश राजयोग तर गुरूने मीन राशीत हंस राजयोग साकारला आहे. बुध व सूर्याची युतीने बुधादित्य राजयोग तयार झाला आहे आणि मीन राशीतच त्रिगही योग सुद्धा जुळून आला आहे. याशिवाय गुरु व चंद्राच्या युतीने साकारलेला गजकेसरी राजयोग सुद्धा प्रबळ बनत आहे. नववर्षातील ग्रह पद बदलांनुसार यंदाच्या वर्षी बुध ग्रह मंत्रिपद भूषवणार आहे तर धनदान कार्य शनिवर सोपवण्यात आले आहे. गुरु ग्रह यंदा पाऊसाचा वाहक असणार आहे. यामुळे १२ राशींच्या भाग्यात ग्रह प्रभावाने विविध बदल दिसुन येऊ शकतात. १२ राशींसाठी हिंदू नववर्ष कसे असणार हे जाणून घेऊया…
मेष (Aries Zodiac)
मेष राशीच्या मंडळींसाठी हिंदू नववर्ष किंचित चिंताजनक असू शकते. आपल्या राशीच्या कुंडलीत राहू व शुक्राची युती होत असल्याने आपल्याला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे, आहाराकडे लक्ष द्यावे लागेल. तसेच नवे व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
वृषभ (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या मंडळींना सुद्धा शुक्र- राहू युती त्रास देऊ शकते. पण तुमच्यावर शनिदेव व माता लक्ष्मीचा वरदहस्त कायम असणार आहे. तुम्हाला नव्या नोकरीच्या माध्यमातून प्रचंड धनलाभ होऊ शकतो. जेवढे पैसे कमवाल तेवढे खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या मनावर व खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
मिथुन (Gemini Zodiac)
मिथुन राशीच्या मंडळींच्या नशिबाचे दार यंदा उघडणार आहे, वर्षाच्या सुरवातीलाच तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीतून शनीची साडेसाती संपली आहे. येत्या काळात तुम्हाला व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती करता येऊ शकते. स्वतःवर सोडून इतरांवर विश्वास ठेवणे टाळा.
कर्क (Cancer zodiac)
कर्क राशीच्या मंडळींना बेजबाबदार वागून अजिबात चालणार नाही. जेवणाकडे लक्ष द्या. तुम्हाला यंदाचे वर्ष हे चढ- उतारांचे असणार आहे. त्यामुले दोन्ही स्थितींमध्ये अतिउत्साह दाखवू नका. सावधपणे वागणे हिताचे ठरेल.
सिंह (Leo Zodiac)
सिंह राशीच्या मंडळींना भाग्योदय होण्याचे योग आहेत कोर्टाच्या खटल्यांमध्ये आपल्याला हवा तसा निर्णय लागू शकतो. व्यवसाय वृद्धीसाठी संपर्क वाढवण्याची वेळ आहे. तुम्हाला स्पर्धकांचा सामना करावा लागेल. आपल्या राशीचे स्वामी गुरु हे एप्रिलमध्ये आपल्या राशीच्या भाग्य स्थानी भ्रमण करणार आहेत त्यामुळे प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते.
कन्या (Virgo Zodiac)
कन्या राशीच्या मंडळींसाठी ऑक्टोबर योग आहेत. आशीर्वादाने धनलाभ, पद- प्रतिष्ठा लाभू शकते मात्र ऑक्टोबरमध्ये केतूचे गोचर होऊन प्रभाव वाढू लागताच आरोग्य बिघडण्याचे संकेत आहेत. सुदृढ राहण्यावर लक्ष द्या.
तूळ (Libra Zodiac)
तूळ राशीच्या विद्यार्थी दशेतील मंडळींसाठी येणारा कला लाभदायक ठरू शकतो. तसेच गरोदर महिलांना आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. तुमच्या राशीत यंदा विवाह योग सुद्धा आहेत.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
वृश्चिक राशीच्या मंडळींना हृदयाची काळजी घ्यावी लागेल, मानसिक तणावापासून स्वतःला विचारपूर्वक लांब ठेवा. या काळात विनाकारण जबाबदारी घेणे टाळा. वादाचे संकेत ओळखून परिस्थिती शांततेने हाताळण्याचा प्रयत्न करा.
धनु (Sagittarius Zodiac)
धनु राशीच्या मंडळींना प्रवासाचे योग आहेत. लहान भावंडांची जबाबदारी उचलावी लागू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी मन जपून काम करावे लागेल. कौटुंबिक प्रेमाने मन शांत राहण्यास मदत होऊ शकते. येत्या काळात तुमची मनःस्थिती आनंदी असल्याने मोठी कामे मार्गी लागू शकतात ज्यातून धनलाभाचे योग आहेत.
मकर (Capricorn Zodiac)
आपल्या राशीत शनीच्या साडेसातीचा प्रभाव तिसऱ्या टप्प्यात आहेत. यामुळे धनहानी टाळण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मकर राशीच्या मंडळींना कठोर शब्दांपासून स्वतःला दूर ठेवावे, वाणीवर प्रचंड संयमाची गरज आहे, कामात प्रगती लाभेल पण तितकेच हितशत्रु सुद्धा वाढू शकतात.
हे ही वाचा<< पाच राजयोगांचा गुढीपाडवा! हिंदू नववर्षात ‘या’ राशींच्या नशिबाला मिळू शकते कलाटणी; तुम्हाला धनलाभ कधी?
कुंभ (Aquarius Zodiac)
कुंभ राशीच्या मंडळींना आपला अहंकार घातक ठरू शकतो. या राशीत शनी व मंगल एकत्र नवपंचम योग साकारून पूर्ण वर्ष साथ देणार आहेत. जाणून बुजून वादापासून लांब राहा. मध्यस्थी करणे सुद्धा टाळा. तुम्हाला शेअर मार्केट गुंतवणुकीतून धनलाभाचे उत्तम योग आहेत.
मीन (Pisces Zodiac)
एप्रिल महिन्यात गुरु ग्रह मीन राशीत येणार आहेत. यामुळे मीन राशीच्या मंडळींना परदेश यात्रेचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचं खूप कौतुक होऊ शकतं. याच कौतुकामुळे तुम्हाला पदोन्नती व पगारवाढीचा संधी मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)