ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना विशेष महत्त्व आहे. न्यायदेवता शनि एकदा का राशीत आले की, जीवनात उलथापालथ सुरु होते. त्यामुळे अनेकांना आपल्या राशीत शनिदेव आले की चांगलाच घाम फुटतो. कारण शनिदेव हे सर्वात दीर्घ म्हणजेच अडीच वर्षांनंतर राशी बदलतात. शनि ज्या राशीत प्रवेश करतात. त्या राशीच्या मागच्या पुढच्या राशीला साडेसातीचा पहिला आणि शेवटचा टप्पा सुरु होतो. २९ एप्रिल शनिदेव कुंभ राशीत असणार आहेत. त्यामुळे मकर राशीला साडेसातीची शेवटची अडीच वर्षे आणि मीन राशीला साडेसातीच सुरुवात होणार आहे. त्यामुळे साडेसात वर्षानंतर धनु राशीची साडेसाती संपणार आहे. तर शनिचा कुंभ राशीत प्रवेश होताच दोन राशींवर शनिची अडीचकी सुरू होईल. २९ एप्रिलपर्यंत २०२२ पर्यंत मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर शनि अडीचकीचा प्रभाव असेल. यानंतर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर अडीचकी सुरू होईल.
शनिचं वक्री अवस्थेत संक्रमण
१२ जुलैपासून शनिदेव पुन्हा एकदा आपल्या पूर्वीच्या राशीत मकर राशीत वक्री स्थितीत प्रवेश करणार आहेत. मकर राशीत शनि राशी येताच मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर पुन्हा शनि अडीचकीच्या प्रभावाखाली येतील. १७ जानेवारी २०२३ पर्यंत शनिच्या कठोर कालावधीला सामोरे जावे लागेल. शनिची अडीचकी सुरू झाल्यामुळे या लोकांना करिअर आणि व्यवसायात अपयशाला सामोरे जावे लागू शकते. काही महत्त्वाची कामे अडकू शकते. व्यवसायात चांगला फायदा होणार नाही. निराशा होऊ शकते. चला जाणून घेऊया शनीच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींवर सर्वाधिक परिणाम होईल.
कर्क: ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी पुढील अडीच वर्षे त्रासदायक ठरू शकतं. कारण शनिचा कुंभ राशीत प्रवेश होताच या राशीच्या लोकांवर शनि अडीचकीला सुरुवात होईल. ज्योतिष शास्त्रानुसार शनि अडीचकीच्या काळात कोणतेही काम अत्यंत सावधगिरीने करण्याचा सल्ला दिला जातो. कारण या काळात नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
वृश्चिक: कुंभ राशीत शनीच्या प्रवेशाने वृश्चिक राशीच्या लोकांवरही शनि अडीचकीची सुरुवात होईल. शनि अडीचकीचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात काम संथ गतीने पूर्ण होते. असे मानले जाते की शनिदेवाच्या अडीचकीमुळे कोणत्याही कामात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात.
मकर: ज्योतिष शास्त्रानुसार मकर राशीला सावध राहण्याचा आणि संयम बाळगण्याचा सल्ला दिला जातो. शनिच्या या संक्रमणाने मकर राशीच्या लोकांसाठी शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. या दरम्यान अनेक समस्या उद्भवू शकतात, अचानक बिघडलेल्या तब्येत सोबतच मनात अस्वस्थता आणि विचलितता देखील येऊ शकते. या काळात जास्त विचार करणे टाळा.
Budh Gochar 2022: बुध ग्रह शुक्राच्या राशीत करणार प्रवेश, तीन राशींना मिळणार आर्थिक पाठबळ
कुंभ: ज्योतिषांच्या मते, शनिचा कुंभ राशीत प्रवेश होताच कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप कठीण काळ सुरू होऊ शकतो, कारण या काळात या राशीच्या लोकांवर शनि साडेसातीचे दुसरे चरण सुरू होईल. या काळात व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या काळात अत्यंत सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.
मीन: ज्योतिष शास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी २९ एप्रिल २०२२ पासून शनिच्या संक्रमणाने शनी साडेसाती सुरू होईल. पहिल्या टप्प्यातत शारीरिक आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात. ज्यांच्या कुंडलीत बलवान शनि आहे त्यांना लाभ होताना दिसतील. तर ज्यांच्या कुंडलीत शनि कमकुवत आहे त्यांना उपाय करण्याचा सल्ला दिला आहे.
हे उपाय तुम्हाला शनिदोषापासून दिलासा देऊ शकतात
- साडेसाती आणि अडीचकी सुरु होते तेव्हा शनिवारी उडीद डाळ, काळे कापड, काळे तीळ आणि काळे हरभरे यासारख्या काळ्या वस्तू एखाद्या गरीब व्यक्तीला दान कराव्यात. असे केल्याने शनिदेवाची कृपा कायम राहते.
- शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. त्याचबरोबर आरोग्यही चांगले राहते.
- ‘ओम प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः’ आणि ‘ओम शं शनिश्चरायै नमः’ या मंत्राचा जप करा
- शनिदेवाची साडेसाती किंवा अडीचकी सुरु आहे, अशा लोकांनी शनिवारी हनुमानाची पूजा करावी. हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडचा पाठ करावा. यामुळे शनिदेवाचे नकारात्मक परिणाम कमी होतात.