Shani Gochar 2023: ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनीच्या मार्गी, वक्री, उदय, अस्त अशा लहानश्या हालचालीने सुद्धा १२ राशींच्या तन-मन- धनावर प्रभाव पडतो असे मानले जाते. येत्या तीन दिवसात शनी व सूर्य यांची युती होऊन समसप्तक राजयोग निर्माण होणार आहे. सूर्यदेव १७ ऑगस्टला सिंह राशीत प्रवेश करणार आहे जी त्यांची स्वराशी मानली जाते. यावेळी कुंभ राशीतील शनी व सिंह राशीतील सूर्य समोरासमोर आल्याने समसप्तक राजयोग तयार होणार आहे. याचा प्रभाव खरंतर सर्वच राशींवर कमी अधिक प्रमाणात दिसून येणार आहे पण तीन अशा राशी आहेत ज्यांना या युतीचा सर्वाधिक लाभ होऊ शकतो. त्यांना केवळ प्रगतीच नव्हे तर धनलाभाचे सुद्धा योग आहेत. या नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया…
वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)
वृषभ राशीच्या मंडळींसाठी समसप्तक राजयोग अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव आहेत जे सध्या वृषभ राशीतच गोचर कुंडलीत तिसऱ्या स्थानी वक्री अवस्थेत आहेत. यामुळे तुमच्या वागण्या-बोलण्यातील साहस वाढू शकते. परदेशी गुंतवणुकीची संधी व लाभ दोन्ही कुंडलीत पाहायला मिळत आहेत. सूर्य व शनी एकत्र आल्याने आपल्या कुंडलीत कारकक्ष राजयोग सुद्धा निर्माण होत आहे जो विशेषतः तुमच्या कामाच्या संबंधित प्रगतीशी संबंधित आहे. ज्या व्यक्ती राजकारणात सक्रिय आहेत किंवा होऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत लाभदायक ठरू शकते. याशिवाय नोकरदारांना सुद्धा पदोन्नतीचे योग आहेत.
सिंह रास (Leo Zodiac Horoscope)
सिंह राशीच्या मंडळींसाठी समसप्तक राजयोग हा आनंदाचे डोही आनंद तरंग असे काहीसे वातावरण घेऊन येणार आहे. तुमच्या गोचर कुंडलीत बुधादित्य राजयोग सुद्धा तयार झालेला आहे यामुळे अचानक व अनपेक्षित धनलाभाची चिन्हे आहेत. भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही इतरांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊ शकता. प्रॉपर्टी व गाडी खरेदी करण्यासाठी ही वेळ शुभ आहे. स्पर्ध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एखादी महत्त्वाची घटना घडू शकते.
हे ही वाचा<< नागपंचमीला लक्ष्मी सोनपावलांनी ‘या’ राशींच्या घरी येणार? अत्यंत दुर्मिळ योग बनल्याने महादेव देणार भक्तांना प्रसाद
वृश्चिक रास (Scorpio Zodiac Horoscope)
वृश्चिक राशीच्या मंडळींना समसप्तक राजयोग बनल्यामुळे नशिबाची जोरदार साथ लाभू शकते. आपल्या गोचर कुंडलीत मंगळ प्रभावी आहे. याशिवाय आता शनी व सूर्य एकत्र आल्याने जुन्या कर्माचे फळ मिळू शकते. आपण जर यापूर्वी गुंतवणूक केली असेल तर त्याचा सुद्धा मोठा लाभ होऊ शकतो. कुंडलीत दहाव्या स्थानी बुधादित्य राजयोग सक्रिय असल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी मिळेल अशी घटना घडू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)