Shani Tri Ekadashi Rajyog 2023: ज्योतिष तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढील अडीच वर्ष शनिदेव ज्या राशीत स्थिर असणार आहेत, शनिदेव हे कर्मदेवता म्हणून ओळखले जातात. ज्योतिषतज्ज्ञांच्या माहितीनुसार येत्या २१ एप्रिलला शनी व गुरु युती होणार आहे. या युतीसह ‘त्रि-एकादशी’ योग सुद्धा तयार होत आहे. २०२५ पर्यंत शनीचा प्रभाव ज्या राशीवर असेल त्यांना कर्माचे फळ द्विगुणित होऊन मिळू शकणार आहे. शनिदेव एप्रिल महिन्यात बृहस्पती गुरु देव यांच्यासह ‘त्रि-एकादशी’ योग बनवून काही राशींवर धनवर्षाव करणार आहेत. येत्या महिन्यातील या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना कसा लाभ होणार हे पाहूया…
तूळ रास (Libra Zodiac)
या राशीला शनी पाचवा येत आहे. तूळ- कुंभ या दोन्ही वायूंनी बौद्धीक राशी त्यामुळे विज्ञानशाखेच्या लोकांना या अडीच वर्षात उत्तम संधी प्राप्त होतील. नवे संशोधन नवे विचार पुढे येतील. प्रगतीशील कामे होतील. समाजकार्यांत, राजकारणात संधी प्राप्त होतील. शेअर्स, म्युच्युअल फंड यात केलेली गुंतवणूक फायदेशील ठरेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणात विशेष प्रगती दिसून येईल. २१ एप्रिल रोजी मेष राशीत येणारा गुरू शनीशी शुभयोग करील यातूनच उत्तम कल्पना सुचतील त्या साकार करण्यासाठी पूर्ण वर्षातील काळाचा सदुपयोग करावा.
मेष रास (Mesh Rashi)
गुरुचे षष्ठातील आगमन २१ एप्रिल २०२३ रोजी होत आहे. त्यातून शनीशी होणारा शुभयोग कौटुंबिक कलह दूर करील. स्थावर इस्टेट मालमत्ता शेती वाडीच्या खरेदीविक्रीतून फायदा होईल. कोर्टकचेरी निकालात यश लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
सिंह रास (Sinha Rashi)
कुंभेतील स्वगृहीच्या शनीमुळे सिंह राशीस प्रेम व धनाचा लाभ मिळू शकतो. एप्रिलनंतर होणारा गुरू सहवास खूप मदतीचा ठरेल. या काळात स्वमनाशी होणारा संवाद कठीण समस्याचे रुप साधे सोपे करील. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे यासाठी पथ्य पाणी सांभाळणे आवश्यक ठरेल.
हे ही वाचा<< लक्ष्मी कृपेने २७ एप्रिलपासून ‘या’ राशींना चहुबाजूने मिळणार धन? गुरु उदय होताच श्रीमंती चालून दारी येऊ शकते
मकर रास (Makar Rashi) ‘
शनिदेव मकर राशीच्या कर्म भावी गोचर करत आहेत. यामुळे त्यांची सप्तम स्थानी प्रभावी दृष्टी पडू शकते. तुम्हाला दशमी दृष्टीचा शुभ फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते. पार्टनरशिपमध्ये काम केल्यास तुमचा आर्थिक स्रोत बलाढ्य होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)