Shani Rashi Parivartan 2023: २०२३ मध्ये अनेक ग्रहांचे भ्रमण होईल. १७ जानेवारीला शनिदेव आपली राशी बदलणार आहेत. तब्बल ३ दशकानंतर शनिदेव स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान होतील. कर्मदाता शनिच्या या राशी परिवर्तनामुळे काही राशींना याचा चांगला परिणाम दिसून येईल. या काळात शनिच्या साडेसतीपासून देखील सुटका होईल. दुसरीकडे, ३० जानेवारी ते ६ मार्च २०२३ पर्यंत, शनिदेव अस्त अवस्थेत राहतील. १५ दिवसात शनिदेवाच्या स्थितीत दोनदा बदल होईल. ज्यामुळे सर्व राशींवर त्याचा परिणाम दिसून येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिदेवाचे संक्रमण आणि अस्त ‘या’ राशींसाठी फायदेशीर ठरेल

तूळ राशी

कर्मदाता शनिदेवाचे संक्रमण तुम्हाला चांगला लाभ देईल. यावेळी तुम्हाला शनिदेवाच्या साडेसतीपासून मुक्ती मिळेल. या काळात तुमची शैक्षणिक आणि करिअरच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकते. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. या काळात व्यावसायिकांच्या व्यवसायाचा चांगला विस्तार होण्याची शक्यता आहे. यावेळी शनिदेवाच्या कृपेने तुम्ही एखादे नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसंच या काळात तुम्हाला लांबचा प्रवास करण्याची संधी मिळू शकते.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा प्रभाव शुभ राहील . नोकरी मिळण्यासोबतच तुम्हाला कुठेतरी बराच काळ अडकलेला पैसा मिळू शकतो. यादरम्यान पदोन्नतीचीही शक्यता निर्माण होत आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ त्यांच्यासाठी अनुकूल आहे, त्यांना अपेक्षित परिणाम साधण्यात यश मिळू शकते. अविवाहित लोकांसाठी विवाहाची शक्यता निर्माण होत आहे. नवीन मालमत्ता बनवण्याची संधी मिळू शकते. व्यवसायातही वाढ होण्याची शक्यता आहे.

( हे ही वाचा: ३० जानेवारीला शनिदेव अस्त होताच ‘या’ राशी होणार श्रीमंत? शनि साडेसातीच्या त्रासापासूनही होईल सुटका)

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिच्या स्थितीत दोनदा बदल होणे खूप शुभ ठरू शकते. या काळात तुमच्यावर आलेली संकट संपण्याची दाट शक्यता आहे. या दरम्यान तुम्हाला नोकरी मिळू शकते. ज्यामुळे तुमची चांगली भरभराट होईल. या काळात तुमचा समाजातील मान सन्मान वाढू शकतो, तसंच तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. या काळात तुम्ही प्रवासात जास्त वेळ घालवू शकता. या काळात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल आहे.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे )

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shanidev rashi privartan 2023 shani asta effect on these zodiac sign become rich gps