Navpancham Rajyog Shani-Shukra: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह काही ठराविक वेळेनंतर मार्ग बदलतात, राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतात. त्यातही जेव्हा काही बलाढ्य ग्रह म्हणजेच शनी- मंगळ राशी व नक्षत्र बदल करतात तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर काही अंशी दिसून येतो, तुमच्या गोचर कुंडलीतील स्थानानुसार हा प्रभाव शुभ- अशुभ असू शकतो. येत्या मे महिन्यात चार ग्रहांचे महागोचर होणार आहे. तर ३० वर्षांनी कुंभेत स्थित शनी सुद्धा वक्री होण्याच्या तयारीत आहे. यावेळी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे ६ मेला वृषभ राशीतील शुक्र व कुंभेतून वक्री झालेला शनी यांचा संयोग जुळून येणार आहे. यातून नवपंचम राजयोग तयार होत असून यामुळे काही राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार आहे. या भाग्यवान राशी कोणत्या हे पाहूया..
नवपंचम राजयोग बनल्याने ‘या’ राशी पैसे मोजत राहतील?
मेष रास (Mesh Rashi)
नवपंचम राजयोग हा मेष राशीसाठी अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये शनिदेव लाभ स्थानी तर शुक्रदेव हे तिसऱ्या स्थानी स्थिर असणार आहेत. शुक्रदेव आपल्या राशीत धन, आर्थिक मिळकत, आनंद व प्रेमाचे स्वामी आहेत. यामुळे त्यांचे राशीतील स्थान तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. भावंडांच्या सहयोगाने तुम्हाला प्रचंड धनलाभाचे योग आहेत. तसेच कौटुंबिक कारणाने प्रवास करावा लागू शकतो. तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा करू इच्छित असाल तर येत्या काळात तुम्हाला गुंतवणूकदार व भांडवल प्राप्त होण्याची संधी आहे.
वृषभ रास (Vrushbh Rashi)
नवपंचम राजयोग बनल्याने वृषभ राशीला बक्कळ पैसा मिळू शकते. या आर्थिक मिळकतीचे मुख्य माध्यम तुमचा जोडीदार ठरू शकतो. तुम्ही प्रेमाच्या माणसांचा विश्वास व मत लक्षात घेऊनच निर्णय घ्यायला हवेत. तुमच्या राशीत शनिदेव कर्म भावी तर शुक्रदेव धर्म भावी स्थिर आहेत. तसेच योगायोगाने शनी- शुक्राचं नवपंचम राज्योगाला मंगळाची सुद्धा तगडी साथ लाभू शकते. तुमच्या वाणीने तुम्ही समाजात एक वेगळे स्थान निर्माण करू शकाल. बेरोजगारांना नोकरीच्या संधी चालून येतील पण तुम्हाला काहीसे सामंजस्य दाखवावे लागू शकते.
हे ही वाचा<< शनी वक्री ते मंगळ गोचर, मे महिन्यात बनले चार महाराजयोग! कोणाला धनलाभ, कोणाला कष्ट? पाहा १२ राशींचे भविष्य
मिथुन रास (Mithun Rashi)
शुक्रदेव तुमच्या राशीत लग्नस्थानी तर शनिदेव लाभ स्तनी स्थिर होणार आहेत. यामुळे तयार होणाऱ्या नवपंचम राजयोगाचा तुम्हाला खूप मोठा फायदा घेता येऊ शकतो. तुम्हाला व्यक्तिमत्वात बदल घडवून आणण्यासाठी काहीसे कठोर परिश्रम घ्यावे लागतील. मात्र तुमच्या एका शब्दात अनेक कामे मार्गी लागू शकतात. तुम्हाला येत्या महिन्याभरात आरोग्य जपावे लागेल. तसेच ६ मे २०२३ नंतर जोडीदारासह बोलताना संयमाने वागावे लागेल. आई- वडिलांच्या रूपात तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)