Shani Sun Transit 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हे सूर्यपुत्र म्हणून ओळखले जातात पण शनि व सूर्याचा स्वभाव हा एकमेकांच्या विरुद्ध असल्याचे मानले जाते. म्हणूनच जिथे ग्रहांचा राजा हा लोकांना सन्मान, यश, आरोग्य व समृद्धी देऊ करतो, तिथेच शनिदेव लोकांना कर्मानुसार फळ देण्याचे काम करतात. शनिच्या कृपेने किंवा वक्रीदृष्टीने माणसाचं आयुष्यात शुभ- अशुभ प्रभाव आढळून येत असल्याची मान्यता आहे. हे दोन ग्रह यापूर्वी अगदी क्वचित एका राशीत एकत्र आले आहेत, मात्र २०२३ या वर्षात ही अत्यंत दुर्मिळ घटना पुन्हा घडणार आहे. २०२३ च्या फेब्रुवारीमध्ये शनि व सूर्य कुंभ राशीत एकत्र येणार आहेत. याचा प्रभाव सर्वच १२ राशींवर दिसून येईल मात्र अशा काही राशी आहेत ज्यांना या युतीचा सर्वात जास्त लाभ होऊ शकणार आहे.

३० वर्षांनी शनि व सूर्य ‘या’ दिवशी येणार एकत्र

ज्योतिषांच्या माहितीनुसार हा अत्यंत शुभ व दुर्मिळ योग तब्बल ३० वर्षानंतर बनत आहे. मुळात कुंभ ही शनीची रास आहे. येत्या नववर्षात १७ जानेवारीला शनि आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ मध्ये गोचर करणार आहेत. तर १३ फेब्रुवारीला कुंभ राशीत सूर्याचा प्रवेश होणार आहे. सूर्य व शनि १४ मार्च २०२३ पर्यंत कुंभ राशीत एकत्र असणार आहेत. शनि व सूर्याचे कुंभ राशीत गोचर होताच नेमक्या कोणत्या राशीला कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेउयात..

हे ही वाचा<< मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राशींना प्रचंड धनलाभाची संधी; शनिच्या प्रिय राशींना ‘या’ रूपात मिळू शकते अपार सुख

शनि-सूर्य ‘या’ राशींना देऊ शकतात अपार धनलाभ

शनिने आपल्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करताच तब्ब्ल ६ राशींचे भाग्य पालटणार आहे. शनीच्या कृपेने वृषभ, मिथुन,कन्या , मकर, धनु, कुंभ या राशींना अपार धनलाभाचे योग तयार आहेत. या राशींना विविध स्रोतातून श्रीमंती लाभू शकते. केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक शांती लाभल्याने तुम्हाला सर्वांगीण लाभ होऊ शकतो. चारही बाजूंनी सुखप्राप्ती होताच या सहा राशींच्या व्यक्तिमत्वात सुद्धा अनेक महत्त्वपूर्ण बदल दिसून येऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढून संवाद कौशल्याने तुम्ही हजारोंची मने जिंकू शकाल . जर तुमचे काही जुने वाद असतील तर ते सुद्धा येत्या काळात मिटण्याची पूर्ण शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader