Future of Sharad Pawar in Maharashtra Politics 2025 : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. राज्यातील दोन पक्ष फुटल्यानंतर यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळत आहे. आता निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून महाराष्ट्राची जनता कोणाच्या हातामध्ये पुन्हा एकदा सत्ता देणार, हे पाहणं रंजक ठरेल. याचं उत्तर २३ नोव्हेंबर रोजी मिळणार असलं, तरीही नेमका कौल कोणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे. याच पाश्वभूमीवर आज आपण शरद पवार यांच्या कुंडलीच्या आधारे त्यांचे येत्या काळातील भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…

पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांना गुरुस्थानी मानतात. या दोघांचीही लग्न रास वृश्चिक आहे, त्यामुळे दोघांच्याही राजकीय क्षेत्रात शत्रूवर मात करण्याचे त्यांच्या कसब खूपच आगळेवेगळे दिसून येते. अशा लोकांच्या मनाचा थांगपत्ताही लागत नाही आणि माणसं पारखण्यात ही माणसे सहसा चुकत नाहीत आणि आलेल्या संकटाला एक नवीन अनुभव म्हणून सामोरे जातात. शरद पवारांनी तर तुटलेला पक्ष याही वयात नव्याने उभा केला, त्यासाठी परिश्रम घेतले; त्यात मंगळाच्या वृश्चिक राशीची जिद्द, चिकाटी खऱ्या अर्थाने दिसून येते.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Daily Horoscope 11 December 2024 in Marathi
११ डिसेंबर पंचांग: मोक्षदा एकादशीला धनूसह ‘या’ राशींना भगवान विष्णूसह लक्ष्मीही देईल आशीर्वाद; वाचा तुमचा बुधवार कसा जाणार?
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
10 December Mesh To Meen Horoscope in Marathi
१० डिसेंबर पंचांग: आज वृषभसह ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभाचा योग; आज काय घडल्याने १२ राशींचे मन होईल प्रसन्न? वाचा मंगळवारचे राशिभविष्य
Numerology: अत्यंत विश्वासू असतात या ४ तारखेला जन्मलेले लोक, वाईट काळात देतात साथ

हेही वाचा…Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’

लग्न वृश्चिक रास, रवी-बुधाच्या नक्षत्रात, तर बुध षष्ठातील शनीच्या नक्षत्रात, त्यामुळे लाभेश व पराक्रमेश ही स्थाने पत्रिकेत खूपच प्रबळ झाली आहेत. त्यामुळे शरद पवार असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा व्यक्ती राजकारणात पुढे बराच काळ प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतातील राजकारण बदलण्याचे कसब (शरद पवार) या वयोवृद्ध व अनुभवी नेत्याकडे आहे. पण, एक मात्र खरे की, लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी शरद पवार याही वयात घेतील, हे नक्की. कारण – सत्तेतील पक्षही त्यांच्या विचारांचा सन्मान करतात. हाच भारतभूमीच्या लोकशाहीचा खरा सन्मान आहे.

शरद पवार व नरेंद्र मोदींची लग्नरास एकच; दोघांमध्ये फरक व साम्य काय? वाचा काय म्हणतात ज्योतिषतज्ज्ञ…

या विधानसभा निवडणुकीच्या काळात, बुधामध्ये रवीची अंतर्दशा १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे आणि रवी दशमेश लग्नस्थानी आहे त्यामुळे यश आणि प्रसिद्धी या दोन्ही बाजू शरद पवार यांना या वयातही मानसिक समाधान देतील एवढं नक्की!

Story img Loader