Shardiya Navratri 2022: नवरात्रीचा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. यावेळी पितृ पक्ष २५ सप्टेंबर रोजी संपत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार, २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता ४ ऑक्टोबरला होणार आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्र चालते.
नवरात्रीच्या दिवसांत घरांमध्ये कलश बसवला जातो. या नऊ दिवसांच्या भक्तीमध्ये केवळ भारतातच नाही तर परदेशातही अनेक लोक नवरात्रीचा उपवास करतात आणि अनेक लोक यावेळी दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. पौराणिक मान्यतेनुसार, जेव्हा राम रावणाचा वध करणार होते, त्याआधी त्यांनी नवरात्रीत देवी शक्तीची पूजा केली. जाणून घेऊया यावेळी शारदीय नवरात्र कोणत्या तारखेला येत आहे आणि कोणत्या दिवशी दुर्गा देवीच्या कोणत्या रूपांची पूजा करतात?
आणखी वाचा : Chanakya Niti: जीवनात यश मिळवायचे असेल तर चुकूनही या गोष्टी कोणाशी शेअर करू नका
शारदीय नवरात्री 2022 घटस्थापना
शारदीय नवरात्री २६ सप्टेंबरपासून सुरू होणार असून ४ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. प्रतिपदा तिथी २६ सप्टेंबरच्या पहाटे ३.२४ ते २७ सप्टेंबरच्या पहाटे ३.०८ पर्यंत असेल. दरम्यान, घटस्थापना मुहूर्त २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६.२० ते १०.१९ पर्यंत असेल. दुसरीकडे, अभिजित मुहूर्त २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५४ ते दुपारी १२.४२ पर्यंत असेल.
आणखी वाचा : Numerology : सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये ‘या’ खास गोष्टी असतात, जाणून घ्या…
जाणून घ्या कोणत्या दिवशी देवीच्या कोणत्या रूपांची पूजा?
दिनांक | वार | तिथी | नवरात्रीचा दिवस |
२६ सप्टेंबर २०२२ | सोमवार | प्रतिपदा तिथी | शैलपुत्री पूजा आणि घटस्थापना |
२७ सप्टेंबर २०२२ | मंगळवार | द्वितीया तिथी | ब्रह्मचारिणी पूजा |
२८ सप्टेंबर २०२२ | बुधवार | तृतीया तिथी | चंद्रघंटा पूजा |
२९ सप्टेंबर २०२२ | गुरुवार | चतुर्थी तिथी | कुष्मांडा पूजा |
३० सप्टेंबर २०२२ | शुक्रवार | पंचमी तिथी | स्कंदमाता पूजा |
१ ऑक्टोंबर २०२२ | शनिवार | षष्ठी तिथी | कात्यायनी पूजा |
२ ऑक्टोंबर २०२२ | रविवार | सप्तमी तिथी | कालरात्री पूजा |
३ ऑक्टोंबर २०२२ | सोमवार | अष्टमी तिथी | महागौपूजा, दुर्गा महाष्टमी |
४ ऑक्टोंबर २०२२ | मंगळवार | नवमी तिथी | सिद्धरात्री पूजा, दुर्गा महानवमी पूजा |
आणखी वाचा : Ganesh Chaturthi 2022: ज्योतिष शास्त्रानुसार ‘या’ राशींवर असते गणपतीची विशेष कृपा!
शारदीय नवरात्रीची पूजा पद्धत
सर्वप्रथम मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि 9 प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडे पाणी घाला. आता एक कलश घ्या. त्यावर स्वस्तिक बनवा. मग मौली किंवा कलावा बांधून ठेवा. यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा. त्यात एक पूर्ण सुपारी, फुलं आणि दुर्वा घाला. तसेच अत्तर, पंचरत्न आणि नाणे देखील टाका. कलशाच्या आत आंब्याची पाने लावा. कलशच्या झाकणावर तांदूळ ठेवा. देवीचे स्मरण करताना कलशाचे झाकण लावा. आता एक नारळ घ्या आणि त्यावर कलवा बांधा. कलशवर स्वस्तिक चिन्ह बनवा. कुंकवाने नारळावर टिळक लावा आणि नारळ कलशावर ठेवा. कलशावर नारळासोबत तुम्ही काही फुलेही ठेवू शकता. दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करा.