Shash and Budhaditya Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा खास राजयोग तयार होतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कर्म दाता शनिदेव आपल्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत विराजमान आहेत, ज्यामुळे ‘शश महापुरुष राजयोग’ निर्माण होणार आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग तयार होतो त्यांचं नशीब उजळू लागतं. त्यातच दुसरीकडे सूर्यदेव आणि बुधदेव वृषभ राशीत असल्यानं ‘बुधादित्य राजयोग’ निर्माण होत आहे. जाणून घेऊया दोन शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या व्यक्तींच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत.

कोणाचे येणार सुखाचे दिवस?

वृषभ राशी

शश राजयोग आणि बुधादित्य राजयोग बनल्याने वृषभ राशीच्या लोकांना व्यापारात बक्कळ नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बढतीची चिन्हे आहेत. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येऊ शकते. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात.

(हे ही वाचा : देवगुरुच्या कृपेने २११ दिवस ‘या’ राशींच्या लोकांचे घर धन-धान्यांनी भरणार? २०२५ पर्यंत अपार श्रीमंतीसह लाभेल समृद्धी!)

वृश्चिक राशी

शश राजयोग आणि बुधादित्य राजयोग बनल्याने वृश्चिक राशीच्या लोकांना अनपेक्षित पैसे मिळू शकतात. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांनाही यावेळी चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी ही काळ फलदायी ठरु शकतो. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. 

कुंभ राशी

शश राजयोग आणि बुधादित्य राजयोग बनल्याने कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतो. जुनी देणी परत मिळू शकतात. व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळू शकते. आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. नव्या वर्षात नोकरीच्या नव्या संधी मिळू शकतात. जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळू शकतो. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो आणि गुंतवणुकीतही तुम्हाला आर्थिक नफा मिळू शकतो. जमीन आणि मालमत्तेच्या खरेदी-विक्रीमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. राजकारणी लोकांना मोठे यश मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)