Shash Rajyog : शनि हा अत्यंत क्रूर ग्रह मानला जातो कारण शनि व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो त्यामुळे त्याला कर्मदाता सुद्धा म्हणतात. शनि हा एकमेव असा ग्रह आहे ज्याची साडेसाती असते. व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी शनिच्या साडेसातीचा सामना करावा लागतो. शनि हा अत्यंत हळूवार चालणारा ग्रह आहे. शनि ला संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी जवळपास ३० वर्षांचा कालावधी लागतो.

शनि या वेळी त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये विराजमान आहे. अशात शश नावाचा राजयोग निर्माण होत आहे ज्यामुळे काही राशींना याचा फायदा होऊ शकतो. जाणून घेऊ या शनिच्या शश राजयोगामुळे कोणत्या तीन राशींना लाभ होणार आहे.

Daily Horoscope, 20 November
२० नोव्हेंबर पंचांग: बुधवारी वृषभ, मिथुनसह ‘या’ राशींना होणार दुप्पट लाभ; तुम्हाला चांगले बदल अनुभवायला मिळणार का? वाचा राशिभविष्य
Most Powerful Numbers in Numerology
Numerology: हे ३ अंक मानले जातात जगातील सर्वात…
Gurupushyamrita Yoga in 2024
देवी लक्ष्मी करणार मालामाल; दोन दिवसांनंतर २०२४ मधील शेवटचा ‘गुरूपुष्यामृत योग’; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार बक्कळ पैसा
surya rashi parivartan
शनी-सूर्याच्या जबरदस्त प्रभावाने ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार अन् धनसंपत्तीत वाढ होणार
Mahalakshmi Yoga in kark rashi
महालक्ष्मी योग देणार बक्कळ पैसा; दोन दिवसानंतर ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण
Mesh To Meen Horoscope, 19 November
१९ नोव्हेंबर पंचांग: सूर्याचा अनुराधा नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींच्या आयुष्यात घडवणार मोठे बदल, तुमच्या कामांना मिळेल का यश? वाचा राशिभविष्य
Budh uday 2024 | vrishchik rashi budh uday
Budh Uday 2024 : १२ डिसेंबरपासून ‘या’ राशींची चांदी; बुधाच्या वृश्चिक राशीतील उदयाने मिळणार गडगंज पैसा अन् मानसन्मान
Numerology
Numerology : या तारखेला जन्मलेल्या लोकांजवळ असतो पैसाच पैसा! शुक्राच्या कृपेने मिळते अपार धन संपत्ती
Shadashtak yoga will create Venus-Jupiter planets
२६ नोव्हेंबरपासून नुसती चांदी; शुक्र-गुरू निर्माण करणार षडाष्टक योग, ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

हेही वाचा : शनी-सूर्याच्या जबरदस्त प्रभावाने ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार अन् धनसंपत्तीत वाढ होणार

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि लग्न किंवा चंद्र कुंडलीमध्ये पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या स्थानावर तुळ, मकर आणि कुंभ राशीमध्ये स्थित असेल तर शश राजयोग निर्माण होतो.

मकर राशी (Makar Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी शश राजयोग अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच यांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदेल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील त्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. हे लोक त्यांच्या कार्याद्वारे एक नवीन वेगळी ओळख निर्माण करू शकतात. समाजात या लोकांचा मान सन्मान वाढेन. तसेच हे लोक त्यांच्या वाणीच्या प्रभावामुळे इतर लोकांना प्रेरित करण्यास यशस्वी होऊ शकते. आर्थिक अडचण भासणार नाही. आरोग्य उत्तम राहीन.

कन्या राशी (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या सहाव्या स्थानावर शनि विराजमान राहणार आहे. अशात या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. या लोकांच्या कामाचे वरिष्ठ कौतुक करतील. या लोकांना मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
नशीबाची पूर्ण साथ मिळेन. पैसे कमावण्याचे नवीन स्त्रोत उघडणार ज्यामुळे या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. भविष्यासाठी हे लोक पैशांची बचत करू शकतील. नोकरीच्या नवीन संधी सुद्धा मिळू शकतात. यामुळे करिअरमध्ये एक नवीन बदल दिसून येऊ शकतो. या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन.

हेही वाचा : Budh Uday 2024 : १२ डिसेंबरपासून ‘या’ राशींची चांदी; बुधाच्या वृश्चिक राशीतील उदयाने मिळणार गडगंज पैसा अन् मानसन्मान

कुंभ राशी (Kumbh Zodiac)

या राशीमध्ये लग्न स्थानावर शश राजयोग निर्माण होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना भरपूर लाभ होऊ शकतो. या राशीमध्ये शनिची साडेसाती शेवटच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे या राशींना मार्च २०२५ पर्यंत अनेक क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते. जीवनात अनेक सकारात्मक प्रभाव पडू शकतात.
अनेक काळापासून अडकलेले कामे पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी या लोकांना यश प्राप्त होईल. तसेच मोठा धनलाभ होऊ शकतो. पदोन्नती बरोबर या लोकांचा पगार सुद्धा वाढू शकतो. या लोकांच्या कामाची प्रशंसा करण्यात येईल. व्यवसायात या लोकांना मोठा लाभ होऊ शकतो. धार्मिक कार्यात हे लोक सहभागी होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)