Shash Rajyog: ज्योतिषशास्त्रामध्ये पंचमहापुरूष राजयोगाचे वर्णन केले आहे ज्याला ‘शश राजयोग’देखील म्हटलं जातं. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हा राजयोग असतो अशी व्यक्ती सर्व भौतिक सुख प्राप्त करते. तसेच अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही शिवाय हे लोक समाजात स्वतःची नवी ओळखही निर्माण करतात. खरंतर, शनी लग्न भावातून १,४, ७, १० स्थानात तूळ, मकर किंवा कुंभ राशीत विराजमान असतो तेव्हा हा योग निर्माण होतो. दरम्यान, लवकरच शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे २९ मार्चपर्यंतचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर असेल.
शश राजयोग देणार प्रत्येक कामात यश
मिथुन
शश राजयोग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात या व्यक्तींचा साहस, पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासही वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. केवळ कामात कोणताही हलगर्जीपणा करू नका.
कन्या
शश राजयोग कन्या राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर असेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आयुष्यात आलेल्या अडचणी दूर होईल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शश राजयोग खूप शुभ फळ देणारे ठरेल. स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्यांना यशाचे गोड फळ लाभेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. प्रत्येक कामात यश मिळेल. हवी ती गोष्ट साध्य करण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. आरोग्य उत्तम राहिल. तसेच अडकलेले पैसे मिळतील.