Shatgrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी बदल करतो, ज्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या निश्चितच होतो. यात मार्च २०२५ मध्ये मीन राशीत ग्रहांचा संयोग होणार आहे. राहूसह शनि, शुक्र, बुध, सूर्य आणि चंद्र हे सहा ग्रह मीन राशीत एकत्र भ्रमण करणार आहेत. अशा परिस्थितीत, शतग्रही योग तयार होत आहे.
राहू सध्या मीन राशीत स्थित आहे. यानंतर फेब्रुवारीमध्ये शुक्र आणि बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करतील. यानंतर, १४ मार्च रोजी सूर्य, २९ मार्च रोजी शनि आणि २८ मार्च रोजी चंद्र मीन राशीत प्रवेश करेल. अशाप्रकारे, २९ मार्च रोजी मीन राशीत ६ ग्रहांचा महाकुंभ होत आहे. या राशींमध्ये, शनिदेव हा सर्वात महत्वाचा ग्रह मानला जातो, जो सुमारे ३० वर्षांनी मीन राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत, सर्व १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होईल. पण १२ पैकी अशा तीन राशी आहे ज्यांना याचे सर्वाधिक फायदे मिळू शकतात. चला तर मग या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊ…
शतग्रही योगाने ‘या’ राशींना येणार अच्छे दिन, जीवनात नांदेत सुख, समृद्धी अन् समाधान
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी शतग्रही योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांची बौद्धिक क्षमता वाढू शकते. यासह आत्मविश्वासही वेगाने वाढू शकतो. समाजात आदर वाढेल. अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तुम्ही तुमच्या पालकांबरोबर चांगला वेळ घालवता येऊ शकतो. नोकरदारांसाठीही हा आठवडा खूप फायदेशीर असणार आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. आरोग्यही चांगले राहील.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांना अचानक प्रत्येक कामात यश मिळू शकते. ज्या कामाची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता, त्यात आता तुम्हाला यश मिळू शकते. सूर्य आणि गुरु ग्रहाच्या कृपेने तुम्ही भरपूर पैसे कमावण्यात यशस्वी होऊ शकता. यासह तुम्ही कामाच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने खूप प्रवास करु शकता. यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. शनिदेवाच्या आशीर्वादाने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकता. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात. यासह तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. यासोबतच, व्यवसायात तुम्ही बनवलेल्या पॉलिसींमधून तुम्ही भरपूर नफा कमवू शकता.
मकर
मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंदच असू शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला उत्तम संधी मिळू शकतात. यासह तुम्ही तुमच्या आयुष्याबाबत एक मोठा निर्णय घेऊ शकता. मुलांकडून येणाऱ्या समस्या देखील संपुष्टात येऊ शकतात.
(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)