Aries To Pisces Horoscope Today : आज २२ मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी रविवारी सकाळी ५ वाजून २४ मिनिटांपर्यंत असणार आहे. व्यतिपात योग संध्याकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपर्यंत जुळून येणार आहे. तसेच मूळ नक्षत्र रात्री ३ वाजून २४ मिनिटांपर्यत जागृत असणार आहे. आज राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज शीतला अष्टमी असणार आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवला त्याचे विशेष महत्त्व दिले जाचे. तसेच हिंदू धर्मामध्ये शीतला अष्टमी अगदी उत्साहामध्ये साजरा करतात. शीतला अष्टमीच्या शीतला देवीची पूजा केली जाते. तसेच शीतला अष्टमीच्या दिवशी पूजेमध्ये शिळे जेवन अर्पण केले जाते. तर आज शीतला देवी तुम्हाला कसा देणार आशीर्वाद हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

२२ मार्च पंचांग व राशिभविष्य (Mesh To Meen Horoscope in Marathi) :

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)

जवळची प्रवासात खबरदारी घ्यावी. मानसिक द्विधावस्था वधू शकते. आवडीची कामे करण्यावर भर द्यावा. नामस्मरणासाठी वेगळा वेळ काढावा. तरूणांशी मैत्री कराल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)

तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. फॅशनची हौस पूर्ण कराल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. वाणीत गोडवा ठेवाल. घरगुती कामात वेळ जाईल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)

मनातील संभ्रम दूर करावेत. सरकारी कामे वेळ लावू शकतात. वाताचा त्रास जाणवू शकतो. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी. वारसाहक्काची कामे चिघळू शकतात.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)

भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. जोडीदाराचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मानसिक ताण-तणावापासून दूर राहावे. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. वडीलधार्‍यांचा सल्ला घ्यावा.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)

मनातील इच्छा पूर्ण होईल. अंगीभूत कलेला प्रोत्साहन मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. जोडीदाराशी सल्ला मसलत कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)

जोडीदाराचे उत्पन्न वाढेल. मानसिक संभ्रम दूर करावेत. वेळेचे बंधन पाळावे लागेल. कामातील द्विधावस्था त्रासदायक ठरू शकते. मुलांचे वागणे विरोधी वाटेल.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)

घरगुती परिस्थिती शांतपणे हाताळा. प्रलोभनापासून दूर राहावे. कामात आळस आड येऊ शकतो. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. संयम बाळगावा लागेल.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)

साहस करताना सावधानता बाळगावी. योग्य मार्गाचा अवलंब करावा लागेल. भावंडांचे प्रश्न सामोरी येतील. जोडीदाराची मर्जी राखावी लागेल. प्रवासात खबरदारी घ्यावी लागेल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)

कौटुंबिक प्रश्न शांततेने सोडवावेत. मानसिक दोलायमानता वाढू शकते. स्वत:वरील विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. कायदेशीर कामात वेळ जाईल. नवीन मित्र जोडाल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)

प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. अघळ पघळ गप्पा माराल. नवीन विचारांची कास धरावी लागेल. हातातील अधिकारांचा वापर करावा. चिकाटी सोडून चालणार नाही.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)

हजरजबाबीपणे वागाल. सामुदायिक वादांपासून दूर राहावे. धार्मिक यात्रेचे योग येतील. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)

श्रम काही प्रमाणात वाढू शकतात. कागदपत्रे जपून ठेवावीत. हस्त कलेचे कौतुक केले जाईल. अती श्रमाचा थकवा जाणवेल. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheetala ashtami 2025 on 22 march how will happiness come to you today read 12 zodiac signs horoscope asp