Today’s Horoscope For Zodiac Signs : आज २१ मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी शुक्रवारी सकाळी ४ वाजून २४ मिनिटांपर्यंत असणार आहे. सिद्धी योग संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत जुळून येणार आहे. तसेच ज्येष्ठा नक्षत्र रात्री १ वाजून ४६ मिनिटांपर्यत जागृत असणार आहे. आज राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज शीतल सप्तमी आहे. देवी शीतला ही आरोग्याची देवी असल्याचे म्हटले जाते. असे म्हणतात की, ज्याच्यावर माता शीतलाची कृपा असते त्याला सर्व वेदनादायक रोगांपासून मुक्ती मिळते. होळीचा सण झाल्यानंतर या मातेची आठ ते नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम करून पूजा करण्यात येते. या देवीला ज्वारीच्या पिठाची कडी, कडकण्या, करंज्या, भात व गव्हाच्या पिठाचा शिरा किंवा शिळ्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तर आजचा दिवस तुमच्यासाठी कसे सुख घेऊन येणार चला जाणून घेऊया…
२१ मार्च पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope Today) :
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
जवळचा प्रवास करावा लागेल. कामाची काहीशी धांदल राहील. वैचारिक स्थिरता जपावी. आवडी-निवडी वर अधिक भर द्याल. मनाची चंचलता थांबवावी.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
वाणीत मधुरता ठेवाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन फॅशनचे कपडे खरेदी कराल. आनंदी दृष्टीकोन ठेवून वागाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
मनाची चलबिचलता रोखावी लागेल. अति विचार करणे टाळावे. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. हातातील कामाचे योग्य नियोजन करावे. फार पसारा वाढवून घेऊ नका.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
चांगला व्यावसायिक लाभ होईल. नवीन मित्र जोडले जातील. तुमच्यातील शालीनता दिसून येईल. जिथे जाल तिथे आनंद वाटाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
कामाचा दर्जा सुधारेल. घराची उत्कृष्ट सजावट कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. आपल्या बोलण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
मनाची विशालता दाखवाल. इतरांना सढळ हाताने मदत कराल. सर्वांसमोर तुमची कला सादर करता येईल. गायन, वादन कलेला पोषक वातावरण लाभेल. धार्मिक कामात हातभार लावाल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
शेअर्सच्या व्यवसायातून लाभ संभवतो. व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून वागाल. कमी श्रमात कामे पार पडतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. प्रलोभनापासून दूर राहावे.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
शांतपणे विचार करावा लागेल. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्याल. महिलांना गृहिणीपदाचा मान मिळेल. कर्तव्यदक्षता चांगल्या पद्धतीने पाळाल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
उगाचच खट्टू होऊ नये. आपले गुण सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
नाटक-सिनेमा पाहण्याचा बेत आखाल. दिवस मौजमजेत घालवाल. कलात्मक दृष्टीने वागणे ठेवाल. काहीसा व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल. रागावर नियंत्रण ठेवावे.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
समाधानी वृत्ती ठेवून राहाल. घराची स्वच्छता काढाल. बागबगीच्यात रमून जाल. उत्तम गृहसौख्य लाभेल. घरात सर्वांशी प्रेमाने वागाल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल. वाचनाची आवड पूर्ण करता येईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन गोष्टी शिकून घ्याल. नातलगांशी सलोखा वाढेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर