Shiva Yoga and Ashwini Nakshatra In 2023: नववर्ष २०२३ हे आपल्या सर्वांसाठीच विविध संधी व प्रगतीचे योग घेऊन येणार आहे. या शुभ लाभांसाठी जानेवारी महिन्याचा पहिलाच दिवस मुहूर्त ठरणार आहे. नववर्षात काही राशींना आर्थिक लाभाची व श्रीमंत होण्याची मोठी संधी चालून येऊ शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार १ जानेवारी २०२३ ला शिव व अमृत योग तसेच सर्वार्थ सिद्धी योग निर्माण होत आहे. या वर्षाची सुरुवात ही आश्विनी नक्षत्रापासून होणार आहे. आश्विनी हे केतू ग्रहाचे नक्षत्र मानले जाते. याच नक्षत्रात शिवामृत व सर्वार्थ सिद्धी योग तयार झाल्याने अत्यंत शुभ काळ सुरु होण्याची चिन्हे आहेत. या दोन्ही शुभ योगांचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडणार आहे मात्र तीन अशा राशी आहेत ज्यांना करिअर व व्यवसायात मोठी प्रगती व त्याला जोडूनच प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत या तीन नशीबवान राशी चला पाहुयात..
मकर
सर्वार्थ सिद्धी व शिवामृत योगाने मकर राशीच्या मंडळींचे भाग्य दुप्पट उजळून निघण्याची चिन्हे आहेत. या वर्षात अनेकदा आपल्याला प्रचंड व अचानक असा धनलाभ होऊ शकतो आणि आनंदाची बातमी म्हणजे याची सुरुवात ही १ जानेवारीपासून होणार आहे. या वर्षात तुम्ही उधार दिलेले पैसे व्याजासहित पुन्हा मिळू शकतात. यातूनच तुम्ही नव्या व्यवसायात किंवा वाहन/प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करू शकता. जी कामे आतापर्यंत उद्यावर ढकलली होती त्याच कामातून तुम्हाला प्रचंड लाभ होऊ शकतो. व्यवसायात धनलाभ रूपात लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो.
वृषभ
वृषभ राशीसाठी सुद्धा नववर्ष अमाप संधी घेऊन येत आहे. येत्या दिवसात तुम्हाला नव्या नोकरीचे अनेक प्रस्ताव येऊ शकतात. आपण ज्या ठिकाणी अगोदरच कार्यरत आहात तिथेच तुम्हाला अधिक फायदा होण्याची संधी आहे. साधारण पहिल्या चार महिन्यात तुम्हाला प्रमोशन व पगारवाढ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आपल्या वडिलांसह आपले नातेसंबंध सुधारण्याचा हा काळ असणार आहे. तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर लवकरच तुम्हच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा<< २ आठवड्यांनी ‘या’ राशी होऊ शकतात अपार श्रीमंत; डिसेंबरच्या शेवटचा आठवडा देणार प्रचंड धनलाभाची संधी
मेष
शिवामृत योग हा मेष राशीसाठी धनलाभ तर सर्वार्थ सिद्धी योग हा आरोग्य घेऊन येणार आहे. यावर्षात तुम्हाला परदेश वारीचे प्रबळ योग आहेत. कामाच्या निमित्ताने वारंवार प्रवास होऊ शकतो. पण २०२२ च्या उर्वरित २१ दिवसातील तुमची मेहनत येत्या वर्षभरात लाभदायक ठरू शकते. आपल्याला जोडीदार व आईची साथ मिळाल्याने अनेक कामी मार्गी लागू शकतात. तुमच्या भावंडांशी चांगले संबंध ठेवणे हिताचे ठरेल.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)