Difference between Shivaratri vs Mahashivaratri : यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. या वेळी महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण या दिवशी महाकुंभातील शेवटचे स्नान करता येणार. शिवभक्तांसाठी हा दिवस अत्यंत खास असणार आहे. पण अनेकदा लोकांना शिवरात्री आणि महाशिवरात्री या दोघांमधला फरक कळत नाही. काही लोक विचार करतात की दोन्ही एकच आहे पण दोन्ही वेगवेगळे धार्मिक उत्सव आहेत. आज आपण यातला फरक जाणून घेऊ या.
महाशिवरात्री
महाशिवरात्री वर्षातून एकदाच येते आणि ही महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिव-शक्ती एकत्र आले होते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवसाला अध्यात्मिक महत्त्व आहे. या दिवशी मंदिरात शिव पार्वतीची विशेष पूजा केली जाते. लोक उपवास करतात. अनेक ठिकाणी शिवची शोभायात्रा काढली जाते. या दिवशी शिवची पूजा केल्याने अध्यात्मिक शक्ती वाढते. शिवरात्रीची रात्र मोक्ष प्राप्तीसाठी शुभ मानली जाते. या दिवशी शिवची मनापासून आराधना करणे किंवा पूजा करणे शुभ मानले जाते, अशा लोकांवर शिवची कृपा दिसून येते.
शिवरात्री
शिवरात्री ही प्रत्येक महिन्याला येते. त्यामुळे याला मासिक शिवरात्री असे सुद्धा म्हणतात. ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला येते या दिवशी शिवची पूजा केली जाते. धार्मिक दृष्टीकोनातून महाशिवरात्रीचे महत्त्व शिवरात्रिच्या तुलनेत खूप जास्त असते. शिवरात्रिच्या दिवशी उपवास ठेवणे आणि शिवलिंगावर जल अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मरक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती लाभते.
महाशिवरात्री आणि शिवरात्रीचे धार्मिक महत्व
महाशिवरात्री वर्षातून एकदा येते आणि त्या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह पार पडला होता. शिवरात्री प्रत्येक महिन्याला येते ज्याला मासिक शिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे महत्त्व शिवरात्रीच्या तुलनेने खूप जास्त आहे. या दिवशी रात्री जागरण केल्याने आणि शिवची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात समस्या दूर होते. कुटुंबात सुख शांती लाभते आणि जीवनात भरपूर यश मिळते.