Shravan Lucky Rashi: हिंदू पंचांगानुसार वर्षाचा चौथा महिना हा श्रावणाचा असतो. हा महिना भोलेनाथांच्या पूजा अर्चनेचा मानला जातो. या महिन्यात एकामागोमाग एक सणांच्या तिथी व शुभ मुहूर्त जुळून येत असल्याने धार्मिक दृष्ट्या श्रावण महिन्याला प्रचंड महत्त्व आहे. उत्तरेकडे विक्रम संवत्सर पंचांग पाळले जात असल्याने तिथे एका महिना आधी ‘सावन’ महिन्याचा प्रारंभ होतो. तर मराठी पंचांग शालिवाहन शकेनुसार श्रावण महिना नंतर सुरु होता. यंदा पंचांगानुसार ५ ऑगस्टला श्रावण महिना सुरु होत आहे. तर सावन महिन्याची सुरुवात ही काही दिवस आधी म्हणजे २२ जुलैला होणार आहे. यंदाचा श्रावण महिना हा ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा खास असणार आहे. तब्बल ७२ वर्षांनी श्रावणात आयुष्यमान व सिद्धी योग निर्माण होणार आहे. या कालावधीत भोलेनाह काही राशींचे रक्षण करणार आहेत. शिवशंकर आज काहींना दुःख- संकटांवर मात करण्याची शक्ती देऊ शकतात. महादेवांच्या कृपेने धनी होणाऱ्या या राशी कोणत्या हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्रावणात धनी होतील ‘या’ तीन राशी

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीसाठी श्रावण शुभ असणार आहे. या कालावधीत कर्क राशीचे नशीब उजळणार आहे. कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र, जो भगवान शिवशंकराच्या फार जवळचा मानला जातो. यामुळे चंद्राच्या राशीला भगवान शंकराचा आशीर्वाद लाभणार आहे. श्रावणात भोलेनाथ आपल्या मार्गातील अडथळे दूर करू शकतात. आजवर ज्या गोष्टींच्या रूपात, व्यक्तींच्या रूपात आपल्या वाटेत अडथळा होता त्या गोष्टी आपोआप दूर होऊ लागतील. आपल्याला यावेळी स्वतःमध्ये गुंतवणूक करावी लागेल. नव्या गोष्टी शिकण्यावर भर द्या. आई वडिलांच्या रूपात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीला भगवान शिवशंकराची रासच मानली जाते. भगवान शंकराची विशेष कृपा व प्रेम या राशीला मिळतेच. तसेच एक महत्त्वाची गोष्टी म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचे स्वामी हे शनी देव आहेत. शनी हे भगवान शंकराला आपले आराध्य मानत असल्याने या कालावधीत मकर राशीला दुहेरी लाभ होऊ शकते. मकर राशीला या कालावधीत प्रेमाचा वर्षाव अनुभवण्याची संधी मिळू शकते. विवाह इच्छुक मंडळींना आपल्या मनाप्रमाणे जोडीदार मिळू शकतो. तुम्हाला पैशांच्या बाबत खूप सतर्क राहून निर्णय घ्यावे लागतील. विद्येस आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान देणे आवश्यक असेल. पती- पत्नीच्या किंबहुना जोडीदाराच्या रूपात आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो.

हे ही वाचा<< गुरुपौर्णिमेला ४ दुर्मिळ योग जुळून आल्याने ‘या’ राशींच्या नशीबाचं टाळं उघडणार, उत्पन्नात होणार प्रचंड वाढ? कुणाचे बदलतील दिवस?

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

ज्योतिषशास्रनुसार, कुंभ राशीचे स्वामी सुद्धा शनी देव आहेत. शनीची कुंभ राशीवर विशेष कृपा आहे. मागील दीड वर्षांपासून शनी महाराज हे कुंभ राशीतच भ्रमंती करत आहेत. श्रावणात शनी देव हे वक्री अवस्थेत भ्रमण करणार आहेत. त्यामुळे शनीचा प्रभाव हा थोडा कमी झाला आहे. अशावेळी शनीचे गुरु महादेव हे कुंभेस तारतील. या कालावधीत आपली शारीरिक व मानसिक शक्ती वाढू शकते. संयम बाळगल्यास आपण समस्यांवर मात करू शकता. आपली एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. मन आनंदी असेल त्यामुळे स्पष्ट डोक्याने निर्णय घेऊ शकता. तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढीचा योग आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)