Shravan 2024 Shubh Yog: सनातन हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात शंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असं म्हटलं जातं. यावर्षीचा भगवान महादेवाच्या उपासनेचा श्रावण मास आज ५ ऑगस्ट रोजी सुरू होत असून, तीन सप्टेंबरला या महिन्याची समाप्ती होत आहे. यावर्षी श्रावण मास सोमवारी सुरू होणार असून, सोमवारीच समाप्ती होत आहे. त्यामुळे यावर्षी महादेवाच्या भक्तांसाठी पाच सोमवारचा अनोखा योग जुळून आला आहे. श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी असण्याचा दुर्मिळ योग ७० वर्षांपूर्वी तयार झाला होता. यावेळी श्रावणामध्ये काही शुभयोगही तयार होत आहेत. यंदा श्रावण महिन्यात रवि योग, शुक्रादित्य योग, गजकेसरी योग, हर्ष योग, सौभाग्य योग, बुधादित्य योग, कुबेर योग, षष्ठ योग, वज्र योग आणि नवपंचम योग तयार होत आहेत. त्यामुळे काही राशींच्या जीवनात याचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. त्यांना आयुष्यात अपार यश, सुख, लाभण्याची शक्यता आहे. पाहूयात या भाग्यशाली राशी कोणत्या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा