Shravan 2024 and Shivamuth Pooja : श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात शिवची आराधना केली जाते. या महिन्यात उपवासाला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात उपवास केल्याने शिवाची कृपा प्राप्त होते, अशी मान्यता आहे.

श्रावण महिन्यात सोमवारचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्रावण महिन्यात शिवभक्त दर सोमवारी उपवास करतात व शिवमूठ वाहतात पण तुम्हाला माहिती आहे का, यंदा श्रावण महिना केव्हापासून सुरू होतोय? श्रावण महिन्यात किती श्रावण सोमवार आहेत? आणि प्रत्येक सोमवारी कोणती शिवमूठ वाहावी? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Shravan 2024 shravan month start date and end date how many shravan somwar in shravan month what are the shivamuth pooja)

shravan somvar marathi news
Shravan 2024: श्रावण मास, श्रावणी सोमवार आणि शिवामूठ…नेमकं महत्त्व काय? जाणून घ्या…
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Nag Panchami 2024 Raja Yoga will be created on Nagpanchami
Nag Panchami 2024: चांदीच चांदी! नागपंचमीला निर्माण होणार राजयोग; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींवर असणार नागदेवतेची कृपा
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”
saturn retrograde in aquarius The grace of Saturn will be persons five zodiac signs
दिवाळीपासून कमावणार पैसाच पैसा; ‘या’ पाच राशींच्या व्यक्तींवर असणार शनिची कृपा
Nagpanchami Shubh Yog
५०० वर्षांनी नागपंचमीला ५ शुभयोग; ‘या’ राशींना महादेव देतील अपार धन? नागदेवताच्या कृपेने घरात येऊ शकतो चांगला पैसा
shukra-Ketu yuti from 25 August
२५ ऑगस्टपासून पडणार पैशांचा पाऊस! शुक्र-केतूच्या युतीमुळे ‘या’ चार राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद
shravani shanivar 10th August 2024 Panchang And Rashibhavishya
श्रावणी शनिवार , १० ऑगस्ट पंचांग : नात्यात गोडवा, बक्कळ पैसा तर ‘या’ राशींवर असेल शनिदेवाची विशेष कृपा; वाचा तुमचं राशीभविष्य

पंडित उदय मोरोणे यांनी लोकसत्ताशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती सांगितली.

हेही वाचा : १२ महिन्यांनंतर शुक्र-सूर्याची युती, ऑगस्टपासून ‘या’ राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू; धनलाभासह नोकरीत प्रगतीचे संकेत

यंदा श्रावण महिना केव्हापासून सुरू होतोय? श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत? ( Shravan month start date and end date & how many Shravan Somwar In Shravan Month)

पंडित उदय मोरोणे सांगतात, “यंदा श्रावण महिना हा ५ ऑगस्ट २०२४ सुरू होतोय व २ सप्टेंबर रोजी श्रावण समाप्त होणार आहे. यंदाच्या श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावण महिना हा सोमवार पासूनच होत आहे. या महिन्यात पाच श्रावण सोमवार आले आहेत. या महिन्यात शिवाचा महारुद्रभिषेक करावा. नियमित व्रत करावे. शिवाचा अभिषेक करत १०८ वेळा रोज बेल वाहावे.”

हेही वाचा : नुसती चांदी! एक वर्षानंतर बुध निर्माण करणार ‘भद्र महापुरुष योग’; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार

प्रत्येक सोमवारी कोणती शिवमूठ वाहावी? (shivamuth Pooja)

पंडित उदय मोरोणे पुढे सांगतात, “खाली सांगितल्याप्रमाणे दर सोमवारी शिवमुठ वाहावी.”पहिल्या सोमवारी शिवमूठ तांदूळ वाहावे.दुसऱ्या सोमवारी शिवमूठ तीळ वाहावे. तिसऱ्या सोमवारी शिवमूठ मूग वाहावे. चौथ्या सोमवारी शिवमूठ जव वाहावे. पाचव्या सोमवारी शिवमूठ हरभरा वाहावे.” लग्नानंतर श्रावण महिन्यात पहिले पाच वर्षे मंगळागौरीचे पूजन करावे. श्रावण महिन्यात श्री शिवलिलामृत अकरावा अध्याय रोज वाचावा. जर शक्य नसेल कर तुम्ही दर सोमवारी सुद्धा हा अध्याय वाचू शकता.”

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)