Shravan 2023 11th to 17th September Marathi Rashi Bhavishya: हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पवित्र श्रावण महिना आता शेवटच्या टप्यात आला आहे. यंदा अधिक श्रावण आल्याने तब्बल ५९ दिवस सुरु असणाऱ्या श्रावणाचे आता शेवटचे काही दिवस बाकी आहेत. तारखेला १५ सप्टेंबरला श्रावणी अमावस्येनंतर श्रीगणरायाच्या आगमनासाठी भक्त सज्ज होणार आहेत. तत्पूर्वी श्रावण मास सरतेशेवटी सुद्धा काही राशीच्या भाग्योदयाचे कारण घेऊन आला आहे. श्रावणाच्या सुरुवातीलाच जागृत झालेले शनी देव आता संपूर्ण शक्तीसह १२ राशींच्या कुंडलीत प्रभावी असणार आहेत. तर १५ व १६ सप्टेंबरला साधारण वर्षभराने सूर्यदेव कन्या राशीत प्रवेश घेणार आहेत. ग्रहमानानुसार श्रावणाचा शेवटचा आठवडा म्हणजेच ११ ते १७ सप्टेंबर पर्यंतचा कालावधी तुमच्या राशीसाठी कसा असणार आहे हे पाहूया..
५९ दिवसांचा श्रावण सरताना ‘या’ राशींना करणार मालामाल?
मेष रास (Aries Weekly Rashi Bhavishya)
मेष राशीच्या नशिबात नवी सुरुवात होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तुम्हाला तुमच्या अढळ संकल्पासह पुढे जावे लागणार आहे. उत्साह व ऊर्जा कायम ठेवा. तुम्हाला या आठवड्यात प्रेम व रोमान्स अनुभवण्याची सुद्धा चिन्हे आहेत. वैवाहिक जीवन सुखकर होऊ शकते.
वृषभ रास (Taurus Weekly Rashi Bhavishya)
तुमची सोय थोडी बाजूला करावी लागेल. तुम्हाला अधिकाधिक अनोळखी लोकांशी या आठवड्याभरात संभाषण व संपर्क करावा लागेल. काळजीपूर्वक आपली पाऊले उचलल्यास हा आठवडा सरतेशेवटी आपल्याला बक्कळ धनलाभ देऊन जाऊ शकतो.
मिथुन रास (Gemini Weekly Rashi Bhavishya)
मिथुन राशीसाठी शनिदेव अगोदरच धनलाभ घेऊन येत आहेत. अशातच श्रावणाच्या शेवटी गजकेसरी राजयोग सुद्धा तयार झाल्याने तुम्हाला बुद्धीच्या बळावर मोठे यश मिळवता येऊ शकते. तुमच्या जोडीदाराला दुखावण्याची चूक करू नका.
कर्क रास (Cancer Weekly Rashi Bhavishya)
लक्ष्मीसह स्वतः गणराज तुमच्या राशीवर प्रसन्न आहेत. यामुळे तुम्हाला तुमच्या बुद्धीनुसार वागणेच हिताचे ठरेल, दुसऱ्याविषयी बोलणं टाळा. स्वतःवर लक्ष द्या. तुमच्या नशिबात एखादी सुंदर प्रवासाची संधी सुद्धा दिसून येत आहे. कर्क राशीसाठी हा आठवडा भावुक करणाऱ्या घटनांनी भरलेला असेल.
सिंह रास (Leo Weekly Rashi Bhavishya)
शारीरिक कष्ट उचलावे लागण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला अडथळे दूर करण्यासाठी मनोबल व धैर्य मजबूत करावे लागेल. तुमच्या स्वतःच्या मनाचा कौल ऐकायला वेळ घ्या. फार फुंकून फुंकून निर्णय घ्या. अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा.
कन्या रास (Virgo Weekly Rashi Bhavishya)
तुम्हाला काही प्रमाणात सुख- दुःख दोन्ही घेऊन येणारा असा हा आठवडा आहे. दोन्हीचे मूळ तुमचे कर्म असणार आहे. शेअर बाजार गुंतवणुकीसाठी कालावधी शुभ आहे. हातात पैसा आला तरी उधळपट्टीवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागू शकते.
तूळ रास (Libra Weekly Rashi Bhavishya)
प्रेमाच्या माणसाचा मोठा आधार मिळू शकतो. जुने भांडण सोडवण्याची संधी मिळू शकते. तुमचे संभाषण कौशल्य पारखून पाहण्यासाठी एखादी संधी तुमच्या वाट्याला येऊ शकते. तुमचे शब्द अगदी विचारपूर्वक वापरा. कोणालाही आश्वासन देणे टाळा.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Rashi Bhavishya)
स्वतःचा शोध घ्यायला भाग पडणारा असा हा आठवडा असणार आहे. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. प्रॉपर्टी व वाहन खरेदीचा योग आहे. तुम्हाला गुरु स्वरूप व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे लागत असेल तर आवर्जून घ्या पण घाईत निर्णय घेऊ नका.
धनु रास (Sagittarius Weekly Rashi Bhavishya)
आत्मविश्वास वाढवणारा असा हा कालावधी असणार आहे. तुमच्या आजू बाजूला अचानक ऊर्जेने भरलेली व्यक्तिमत्व जमा होतील यामुळे तुम्हाला तुमच्यातील अनोळखी बाजूंचा परिचय घडून येईल. स्वतःबरोबर वेळ घालवण्याला प्राधान्य द्या. आठवड्याचा प्रत्येक दिवस तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेणारा असेल.
मकर रास (Capricorn Weekly Rashi Bhavishya)
कामाच्या ठिकाणी ताण तणाव वाढू शकतो. तुम्हाला तात्पुरती काही बाबींमध्ये मनाला मुरड घालावी लागू शकते. गणेशोत्सवाच्या आधी तुमच्या हातात तुमच्या मेहनतीचे फळ प्राप्त होण्याची चिन्हे आहेत. जुन्या मैत्रिणीची भेट होऊ शकते.
कुंभ रास (Aquarius Weekly Rashi Bhavishya)
कुंभ राशीसाठी अत्यंत लाभदायक असा हा कालावधी असणार आहे. शनिदेव मार्गी होण्याच्या वाटेवर असताना सध्या तुमच्या राशीत अत्यंत सक्रिय आहेत. परिणामी वाटेत येणारे मोठे अडथळे दूर होऊ शकतात. तुम्हाला एखाद्या जुन्या मित्र- मैत्रिणीची भेट घेऊन आठवणींना उजाळा देता येऊ शकते. भूतकाळात डोकावून पाहताना तुमच्या नशिबात त्याच मार्गाने काहीसे आर्थिक मिळकतीचे स्रोत चालत येऊ शकतात.
हे ही वाचा<< २०२४ जूनपर्यंत शनीचा ‘या’ ३ राशींवर असणार शनीची थेट दृष्टी; अपार श्रीमंतीसह मिळेल नशिबाला कलाटणी
मीन रास (Pisces Weekly Rashi Bhavishya)
मीन राशींच्या कल्पना सत्यात उतरण्यासाठी लाभदायक असा हा कालावधी असणार आहे. तुमच्यातील कलाकाराला वाव द्या. तुम्ही एखादा नवीन प्रयोग करून पाहू इच्छित असल्यास निश्चितच पुढे जाण्याचा विचार करू शकता. आजूबाजूला असणारी माणसं मात्र फार विचारपूर्वक पद्धतीने निवडा.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)